महुआ मोईत्रा यांच्या अडचणी वाढणार? निशिकांत दुबेंनी आता IT मंत्र्यांना लिहिले पत्र 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2023 08:24 PM2023-10-16T20:24:43+5:302023-10-16T20:26:44+5:30

या पत्राद्वारे निशिकांत दुबे यांनी महुआ मोईत्रा यांच्या लोकसभा वेबसाइटवरील लॉगिनचा मुद्दा उपस्थित केला.

bjp mp nishikant dubey wrote letter to it minister to probe mahua moitra log in credentials | महुआ मोईत्रा यांच्या अडचणी वाढणार? निशिकांत दुबेंनी आता IT मंत्र्यांना लिहिले पत्र 

महुआ मोईत्रा यांच्या अडचणी वाढणार? निशिकांत दुबेंनी आता IT मंत्र्यांना लिहिले पत्र 

नवी दिल्ली : भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी रविवारी लोकसभा सभापतींना पत्र लिहून तृणमूल काँग्रेस (TMC) खासदार महुआ मोईत्रा यांच्याविरोधात तक्रार केली आहे. मुंबईतील एका व्यावसायिकाच्या विनंतीवरून महुआ मोईत्रा यांनी लोकसभेत प्रश्न विचारल्याचे निशिकांत दुबे यांनी म्हटले आहे. यानंतर आता निशिकांत दुबे यांनी आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहिले आहे. 

या पत्राद्वारे निशिकांत दुबे यांनी महुआ मोईत्रा यांच्या लोकसभा वेबसाइटवरील लॉगिनचा मुद्दा उपस्थित केला. निशिकांत दुबे यांनी महुआ मोईत्रा यांच्या लोकसभेच्या वेबसाईटच्या लॉगिन क्रेडेंशियल्सची चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच, निशिंकात दुबे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलाने आरोप केला आहे की, महुआ मोईत्रा यांनी लोकसभेच्या वेबसाइटवर आपली लॉगिन क्रेडेन्शियल्स मुंबईस्थित एका व्यावसायिक समूहासोबत शेअर केली आहेत.

अशाप्रकारे महुआ मोईत्रा यांनी आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी वापर केला आहे. जर हे आरोप सिद्ध झाले तर ते केवळ विश्वासार्हतेचा गुन्हेगारी भंग ठरणार नाही तर भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड करेल कारण याद्वारे भारत सरकारच्या वेबसाइटवर प्रवेश देण्यात आला होता, ज्यामध्ये संवेदनशील माहिती आहे, असे निशिकांत दुबे यांनी म्हटले आहे. त्यामुळे महुआ मोईत्रा यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

याचबरोबर, निशिकांत दुबे यांनी वैष्णव यांना लिहिले की, तुम्हाला माहिती आहे की सरकारी वेबसाइट ऑपरेट करण्याची जबाबदारी नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरची (NIC) आहे. ही संस्था कोणत्याही व्यक्तीचे लॉगिन डिटेल्स स्वतःकडे ठेवते. मी तुम्हाला आवाहन करतो की, महुआ मोईत्रा हजर नसलेल्या ठिकाणाहून त्यांचे लोकसभेचे अकाउंट अॅक्सेस करण्यात आले आहे की नाही, याची चौकशी करावी.

जर महुआ मोईत्रा यांच्यावर करण्यात आलेले आरोप खरे असल्याचे आढळले तर ते विश्वासार्हतेचे गंभीर गुन्हेगारी उल्लंघन तसेच भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेचे उल्लंघन आहे. कारण यामुळे अनधिकृत व्यक्तींना सरकारी वेबसाइटवर अॅक्सेस मिळू शकतो, ज्यात गुप्त माहिती असू शकते. हे राष्ट्रीय सुरक्षेसाठी थेट धोका आहे, कारण लोकसभेच्या साइटवर अनधिकृत अॅक्सेस केल्याने संवेदनशील, गुप्त माहिती मिळू शकते, असे निशिकांत दुबे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

आयपी अॅड्रेसचा तपास झाला पाहिजे - निशिकांत दुबे
निशिकांत दुबे यांनी हुआ मोईत्रा यांच्या लोकसभा वेबसाइटवर लॉगिन क्रेडेन्शियल्सचा आयपी अॅड्रेस शोधण्यासाठी तपास सुरू करण्याची मागणी केली. तसेच हुआ मोईत्रा यांचे लोकसभा अकाउंट अशा ठिकाणी अॅक्सेस केले होते की, जिथे त्या हजर नव्हता, यासंदर्भात सुद्धा चौकशी करण्यात यावी, असे निशाकांत दुबे यांनी म्हटले आहे. तसेच, निशिकांत दुबे यांनी या पत्राची प्रत आयटी राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनाही पाठवली आहे.

Web Title: bjp mp nishikant dubey wrote letter to it minister to probe mahua moitra log in credentials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.