चिनी अ‍ॅप डिलीट करा अन् मोफत मास्क मिळवा; 'या' ठिकाणी देण्यात आली भन्नाट ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2020 04:16 PM2020-07-02T16:16:57+5:302020-07-02T16:34:44+5:30

लोकप्रिय अ‍ॅप टिकटॉकसह 59 चिनी अ‍ॅप्सवर मोदी सरकारने बंदी घातली आहे.

bjp making free mask campaign for those who delete chinese apps from their phones | चिनी अ‍ॅप डिलीट करा अन् मोफत मास्क मिळवा; 'या' ठिकाणी देण्यात आली भन्नाट ऑफर

चिनी अ‍ॅप डिलीट करा अन् मोफत मास्क मिळवा; 'या' ठिकाणी देण्यात आली भन्नाट ऑफर

Next

नवी दिल्ली - केंद्र सरकारने भारताच्या सुरक्षिततेला धोका ठरू शकणाऱ्या 59 चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याचा निर्णय सोमवारी जाहीर केला. बाजारात कोट्यवधींच्या संख्येने विकल्या जाणाऱ्या चिनी कंपन्यांच्या मोबाईल फोनमध्ये यापैकी बरीच लोकप्रिय अ‍ॅप इनबिल्ट पद्धतीने उपलब्ध असल्याने सरकारने या अ‍ॅप्सचा वापर करण्यासही बंदी घातली आहे. चिनी अ‍ॅप सर्वांनी डिलीट करावे यासाठी अनेक ठिकाणी जनजागृती करण्यात येत आहे. 

चिनी अ‍ॅप डिलीट करा अन् मोफत मास्क मिळवा अशी भन्नाट ऑफर एका ठिकाणी देण्यात आली आहे. उत्तर प्रदेशमधीलभाजपाच्या नेत्या आणि माजी मंत्री अनुपमा जैस्वाल यांनी ही मोहीम सुरू केली आहे. मोबाईलमधून चिनी अ‍ॅप डिलीट करणाऱ्यांना मोफत मास्क देणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. लोकांमध्ये याबाबत जनजागृती करण्यासाठी त्यांनी ही मोहीम सुरू केल्याचं म्हटलं आहे. महिला कार्यकत्यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. तर आतापर्यंत 100 हून अधिक लोकांनी आपल्या फोनमधून चिनी अ‍ॅप डिलीट केल्याचं त्यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 


 

ही अ‍ॅप वापरू नका!

टिकटॉक, शेअरइट, किवी, यूसी ब्राऊझर, बायडू मॅप, शेइन, क्लॅश ऑफ किंग्स, डीयू बॅटरी सेव्हर, हॅलो, लायकी, यूकॅम मेकअप, मी कम्युनिटी, सीएम ब्राऊझर्स, व्हायरस क्लिनर, एपीयूएस ब्राऊझर, रोमवुई, क्लब फॅक्टरी, न्यूजडॉग, वुईचॅट, यूसी न्यूज, क्यूक्यू मेल, वेईबो, झेंडर, क्यूक्यू म्युझिक, क्यूक्यू न्यूजफिड, बिगो लाइव्ह, सेल्फीसिटी, मेल मास्टर, पॅरलल स्पेस, माय व्हिडिओकॉल झिओमी,
वुई सिंक, ईएस फाईल एक्प्लोरर, ब्युटीप्लस, व्हिवा व्हिडिओ क्यूयू व्हिडिओ इंक, मीटू, व्हिगो व्हिडिओ, न्यू व्हिडिओ स्टेटस, डीयू रेकॉर्डर, व्हॉल्ट हाईड, कॅचे क्लीनर डीयू अ‍ॅप स्टुडिओ,डीयू क्लीनर, डीयू ब्राऊझर, हॅगो प्ले विथ न्यू फ्रेन्डस, कॅम स्कॅनर, क्लीन मास्टर चिताह मोबाईल, वंडर कॅमेरा, फोटो वंडर, क्यू क्यू प्लेअर, वुई मीट, स्वीट सेल्फी, बैदू ट्रान्सलेट, वीमेट, क्यू क्यू इंटरनॅशनल, क्यू क्यू सेक्युरिटी सेंटर, क्यू क्यू लॉन्चर, यू व्हिडिओ, व्ही प्लाय स्टेटस व्हिडिओ, मोबाईल लेजंड्स आणि डीयू प्रायव्हसी.

देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असल्याचे सांगत 59 चिनी मोबाईल अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये टिकटॉक, यूसी ब्राऊझर आणि हॅलो अ‍ॅप यासारख्या लोकप्रिय अ‍ॅप्सचा समावेश आहे. भारताच्या या निर्णयाचं संयुक्त राष्ट्रातील अमेरिकेच्या माजी राजदूत निक्की हेली यांनी भरभरून कौतुक केलं आहे. "चीनच्या आक्रमकतेसमोर झुकणार नाही हे भारताने दाखवून दिलं" असं  म्हणत निक्की हेली यांनी निर्णयाचं कौतुक केलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबतचे ट्विट केले आहे. "चीनसाठी मोठी बाजारपेठ असणाऱ्या भारताने टिकटॉकसह 59 चिनी अ‍ॅपवर बंदी घातलेला निर्णय पाहून चांगलं वाटलं. भारत चीनला सातत्याने तुमच्या आक्रमकतेसमोर आम्ही झुकणार नाही हे दाखवून देत आहे" असं निक्की हेली यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बारा रुपये दराने पेट्रोल खरेदी गेले अन् 12 वाजले; पाहा नेमके काय घडले

"चीनच्या आक्रमकतेसमोर झुकणार नाही हे भारताने दाखवून दिलं"

Video - ...अन् एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं; म्यानमारमधील खाणीत भूस्खलन, 50 जणांचा मृत्यू

CoronaVirus News : कोरोनाशी लढण्यासाठी देशाला 'या' पॅटर्नची गरज; तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी मुलाच्या विवाहात कुटुंबीयांसमवेत धरला ठेका

Sushant Singh Rajput Suicide : आत्महत्येपूर्वी सुशांतने गुगलवर 'हे' केलं होतं सर्च

CoronaVirus News : धोका वाढला! ५ दिवसांत १ लाख नवे रुग्ण; कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ

 

Web Title: bjp making free mask campaign for those who delete chinese apps from their phones

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.