sushant singh rajput googled his name read articles about self before suicide | Sushant Singh Rajput Suicide : आत्महत्येपूर्वी सुशांतने गुगलवर 'हे' केलं होतं सर्च

Sushant Singh Rajput Suicide : आत्महत्येपूर्वी सुशांतने गुगलवर 'हे' केलं होतं सर्च

नवी दिल्ली - छोट्या पडद्यापासून बॉलिवूडपर्यंत यशस्वी प्रवास करणारा सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येने सर्वांनाच धक्का बसला. सुशांतच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. तर काहींनी सुशांतची हत्या केल्याचं म्हणत चौकशीची मागणी केली आहे. आत्महत्येप्रकरणी पोलीस तपास करत आहेत. आतापर्यंत अनेकांचा जबाब नोंदवला गेला आहे. याच दरम्यान आता सुशांतने आत्महत्येपूर्वी गुगलवर काय सर्च केलं होतं याची माहिती समोर आली आहे. 

सुशांतच्या मोबाईलचा फॉरेन्सिक रिपोर्ट समोर आला आहे. रिपोर्टनुसार आत्महत्येपूर्वी जवळपास १० वाजता सुशांतने गुगलवर स्वत:ला सर्च केलं होतं. तसेच स्वत: बाबतचे काही आर्टिकल्स वाचले होते. मोबाईलच्या गुगल सर्च हिस्ट्रीमध्ये त्याने "सुशांत सिंह राजपूत" हे नाव सर्च केल्याचं दिसत आहे. यातून सुशांत आपलं करिअर आणि इमेजबाबत चिंतेत असल्याचं आणखी एक कारणही समोर येतं असल्याचं म्हटलं जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सुशांत सिंग राजपूतने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या घरातून पोलिसांनी कोणतीही सुसाईड नोट मिळालेली नाही. सुशांतचा व्हिसेरा रिपोर्ट समोर आला आहे. या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की सुशांतच्या शरीरावर कोणतेही संदिग्ध रसायन किंवा विष सापडले नाही. पोस्टमार्टमनंतर व्हिसेरासाठी मुंबईतील जे.जे. रुग्णालयात विश्लेषणसाठी पाठवले होते. मुंबई पोलीस सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा वेगवेगळ्या बाजूने तपास करत आहे. या प्रकरणी त्याचा शेवटचा सिनेमा दिल बेचारामधील त्याची सहकलाकार संजना सांघीचाही जबाब नुकताच नोंदवण्यात आला. या प्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी 28 लोकांचा जबाब नोंदवला आहे.

Sushant Singh Rajput Suicide: 'सच्चा मित्र गमावला', सुशांतच्या निधनाने इस्रायल झालं भावूक

Sushant Singh Rajput Suicide : "आमचा महाराष्ट्र पोलिसांवर विश्वास नाही, न्यायालयीन चौकशी केली जावी"

सुशांत सिंहनं आत्महत्या करण्यापूर्वीच विकिपीडियावरील त्याच्या नावाचं पेज ८ वाजून ५९ मिनिटांनी एडिट करण्यात आलं होतं. सुशांतच्या आत्महत्येची माहिती याचवेळी अपडेट करण्यात आली. सुशांतच्या आत्महत्येची बातमी दुपारच्या सुमारास आली. मग सकाळी ८ वाजून ५९ मिनिटांनी विकिपीडिया पेज कोणी एडिट केलं? हे नेमकं कसं काय झालं? याचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. त्यासाठी सायबर सेलची मदत घेतली जात आहे. १४ जूनला सुशांतनं मुंबईच्या वांद्र्यातील घरात गळफास लावून आत्महत्या केली. शवविच्छेदनातून त्यानं आत्महत्या केल्याचं स्पष्ट झालं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : धोका वाढला! ५ दिवसांत १ लाख नवे रुग्ण; कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ

CoronaVirus News : बापरे! खूप काळजी घेतली तरी झाली कोरोनाची लागण?, डॉक्टरांनी सांगितलं महत्त्वाचं कारण

"मोदींच्या मतदारसंघात कामगारांची परिस्थिती अत्यंत वाईट, घर गहाण ठेवून काढताहेत दिवस"

"महाराष्ट्रात लॉकडाऊन की अनलॉक?, हे भ्रमित ठाकरे सरकार"; चंद्रकांत पाटलांचा हल्लाबोल

CoronaVirus News : मृत्यूनंतरही होताहेत हाल! खड्ड्यात फेकले कोरोनाग्रस्तांचे मृतदेह, धक्कादायक Video ने खळबळ

CoronaVirus News : बापरे! '...तर दिवसाला 1 लाख नवे रुग्ण सापडतील'; तज्ज्ञांचा गंभीर इशारा

Web Title: sushant singh rajput googled his name read articles about self before suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.