CoronaVirus News : कोरोनाशी लढण्यासाठी देशाला 'या' पॅटर्नची गरज; तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2020 11:53 AM2020-07-02T11:53:12+5:302020-07-02T12:04:58+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: पाच दिवसांत कोरोनाचे एक लाख नवे रुग्ण आढळून आले आहेत. देशातील रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ आता समोर आला आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अनेक खबरदारीचे उपाय केले जात असतानाच सातत्याने रुग्ण संख्येत वाढ होत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची संख्या 6,04,641 वर पोहोचली आहे.

देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 19,148 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 434 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे देशात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

पाच दिवसांत कोरोनाचे एक लाख नवे रुग्ण आढळून आले आहेत. देशातील रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ आता समोर आला आहे.

देशात आतापर्यंत 89 लाख जणांची चाचणी करण्यात आली आहे. मात्र सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्यूलर बायोलॉजीचे (CCMB) प्रमुख राकेश मिश्रा यांनी याबाबत एक महत्त्वाची माहिती दिली आहे.

कोरोनाचा सामना करण्यासाठी भारताला चाचणी क्षमता जवळपास 10 पट वाढवण्याची गरज आहे. सोमवारी तेलंगणाच्या राज्यपाल तमिलसाई सुंदरराजन आणि इतरांसह व्हिडिओ कॉन्फरन्स दरम्यान मिश्रा यांनी असं म्हटलं आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 10 ते 14 जून दरम्यान, देशभरात दररोज 1.15 लाख ते 1.5 लाख लोकांची चाचणी केली जात आहे. मात्र 'ही संख्या एक लाखाहून अधिक असली पाहिजे असं देखील त्यांनी म्हटलं आहे.

देशामध्ये महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. मुंबईतील धारावीमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या जास्त होती. मात्र आता कोरोनावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवण्यात धारावीत यश आले आहे.

राकेश मिश्रा यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, ज्या प्रकारे मुंबईच्या धारावीमध्ये जास्तीत जास्त लोकांची चाचणी करून कोरोनावर नियंत्रण आणण्यात आले, तशीच परिस्थिती संपूर्ण देशात हवी.

"10 लाख वेगवेगळ्या चाचणी तंत्रांचा वापर करून हे करणं शक्य आहे. आरटी पीसीआर पद्धतीत, जर सर्व काही काळजीपूर्वक केले गेले तर 8 तासांत रिपोर्ट येतील."

आरएनए वेगळे करण्याच्या प्रक्रियेस बराच वेळ लागतो. त्यामुळे निकाल लागण्यास निम्म्याहूनही कमी वेळ लागतो असं देखील CCMB प्रमुख राकेश मिश्रा यांनी म्हटलं आहे.

'CCMBसह अनेक प्रतिष्ठित संस्थांनी अशी मॉडेल्स विकसित केली आहेत. आम्ही आमच्या मॉडेलसाठी परवानगी शोधत आहोत. सरकार चाचणीसाठी पुढील पिढी तंत्रज्ञानाचा वापर देखील करू शकते, ज्यामध्ये एकाच वेळी 10 हजार चाचण्या केल्या जाऊ शकतात.'

चाचणीची किंमतही हळूहळू कमी होईल. देशात व्हायरसचे धोकादायक असे कोणतेही प्रकार नाहीत आणि भारतीयांमध्ये एकूणच मृत्यूचे प्रमाण कमी आहे असं देखील मिश्रा यांनी सांगितलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

भारतात या आधी रुग्णांची संख्या एक लाख होण्यासाठी 110 दिवसांचा कालावधी लागला होता. त्यानंतर गेल्या 45 दिवसांत पाच लाख नवे रुग्ण आढळून आले आहेत.

देशातील एकूण रुग्णांपैकी 1.80 लाखांहून अधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आहे. यानंतर तामिळनाडू आणि दिल्लीचा क्रमांक लागतो. या शिवाय हरियाणा, आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये वेगाने कोरोनाचे नवे रुग्ण आढळून येत आहेत.