'तारक मेहता' फेम मिस्टर सोढीने बेपत्ता होण्याच्या आधी केली होती पोस्ट, २ दिवसांपासून फोनही आहे बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2024 09:31 AM2024-04-27T09:31:46+5:302024-04-27T09:32:29+5:30

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या प्रसिद्ध टीव्ही शोमध्ये रोशन सिंग सोढीची भूमिका साकारणारा अभिनेता चार दिवसांपासून बेपत्ता आहे. वडिलांच्या वाढदिवसासाठी तो दिल्लीला आला होता आणि परतत असताना विमानतळावरून बेपत्ता झाला. सोढीच्या इन्स्टाग्रामवरुन हे उघड झाले आहे की त्याची शेवटची पोस्ट फक्त वडिलांच्या वाढदिवसासाठी होती.

Post made by 'Taarak Mehta' fame Mr. Sodhi before his disappearance, phone is also switched off for 2 days | 'तारक मेहता' फेम मिस्टर सोढीने बेपत्ता होण्याच्या आधी केली होती पोस्ट, २ दिवसांपासून फोनही आहे बंद

'तारक मेहता' फेम मिस्टर सोढीने बेपत्ता होण्याच्या आधी केली होती पोस्ट, २ दिवसांपासून फोनही आहे बंद

'तारक मेहता का उल्टा चष्मा'(Tarak Mehta Ka Ulta Chashma)मध्ये 'रोशन सिंग सोढी'ची भूमिका साकारणारा प्रसिद्ध अभिनेता गुरूचरण सिंग (Gurucharan Singh) चार दिवसांपासून बेपत्ता आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेता काही दिवसांपूर्वी वडिलांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी दिल्लीला गेला होता आणि २२ एप्रिल २०२४ रोजी मुंबईला परतणार होता. मात्र, तो शहरात पोहोचला नाही आणि विमानतळावरूनच बेपत्ता झाला. 

गुरूचरण सिंग अचानक बेपत्ता झाल्याने त्यांचे चाहते चिंतेत असून त्यांच्या वडिलांनीही तक्रार दाखल केली आहे.  रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की त्यांचा ५० वर्षांचा मुलगा सकाळी ८.३० वाजता फ्लाइट पकडण्यासाठी घरातून निघाला होता, परंतु तो मुंबईला पोहोचला नाही किंवा घरी परतला नाही. दरम्यान, गुरुचरणच्या इन्स्टावरुन अशी माहिती समोर आली आहे की, त्यांची शेवटची पोस्ट वडिलांना वाढदिवसाची शुभेच्छा देणारी होती.

शेवटची पोस्ट
गुरुचरण सिंगने वडिलांसोबतचे अनेक फोटो असणारा व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. यामध्ये तो त्यांच्यासोबत खूप खूश दिसत आहे. हे शेअर करताना, गुरुचरणने कॅप्शनमध्ये लिहिले की, वडिलांचा वाढदिवस. ही पोस्ट चार दिवसांपूर्वीच केली होती.

फोन देखील आहे बंद 
दरम्यान, गुरुचरणचा मित्र, सोनी 'पिंकविला'शी बातचीत केली. त्यावेळी त्याने शेअर केले की त्याचा फोन २४ एप्रिलपासून बंद आहे. मुंबईत तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला, पण तो शहरात परतला नाही, अशी तक्रार केल्याचेही त्याने सांगितले. त्याने पुढे सांगितले की, गुरुचरणची प्रकृती बऱ्याच दिवसांपासून ठीक नव्हती.

अभिनेत्याने का सोडली मालिका?
गुरुचरण सिंगने 'रोशन सिंग सोढी'ची भूमिका साकारली होती.  तथापि, प्रेक्षकांच्या मागणीमुळे अभिनेत्याने २०१३ मध्ये एकदा शो सोडला आणि पुढच्या वर्षी परतला होता. पण २०२० मध्ये त्याने हा शो कायमचा सोडला. २०२१ मध्ये, अभिनेत्याने ई टाइम्सला दिलेल्या मुलाखतीदरम्यान तारक मेहता का उल्टा चष्मामधून बाहेर पडल्याबद्दल खुलासा केला. त्याच सुमारास त्याच्या वडिलांची शस्त्रक्रिया झाली होती आणि त्यालाही आयुष्यात काही गोष्टींची काळजी घ्यावी लागली होती, असे त्याने सांगितले होते.

Web Title: Post made by 'Taarak Mehta' fame Mr. Sodhi before his disappearance, phone is also switched off for 2 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.