स्टेडियमला दिलेले नरेंद्र मोदींचे नाव गुजरात सरकारने मागे घ्यावे; भाजप नेत्याचा सल्ला

By देवेश फडके | Published: February 26, 2021 02:13 PM2021-02-26T14:13:49+5:302021-02-26T14:16:48+5:30

गुजरातमधील जगातील सर्वांत मोठ्या आणि अत्याधुनिक क्रिकेट स्टेडियमला नरेंद्र मोदींचे नाव दिल्यानंतर नवीन वादाला तोंड फुटले. यानंतर विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपशासित केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. यातच आता भाजपच्याच एका नेत्याने स्टेडियमला दिलेले नरेंद्र मोदींचे नाव गुजरात सरकारने मागे घ्यावे, असा सल्ला दिला आहे.

bjp leader subramanian swamy suggested gujarat govt withdraw narendra modi name stadium | स्टेडियमला दिलेले नरेंद्र मोदींचे नाव गुजरात सरकारने मागे घ्यावे; भाजप नेत्याचा सल्ला

स्टेडियमला दिलेले नरेंद्र मोदींचे नाव गुजरात सरकारने मागे घ्यावे; भाजप नेत्याचा सल्ला

googlenewsNext
ठळक मुद्देनरेंद्र मोदी स्टेडियमवरून आरोप-प्रत्यारोपविरोधकांची केंद्र सरकार आणि भाजपवर टीकाभाजप नेत्याचा गुजरात सरकारला सल्ला

नवी दिल्ली :गुजरातमधील जगातील सर्वांत मोठ्या आणि अत्याधुनिक क्रिकेट स्टेडियमला नरेंद्र मोदींचे नाव दिल्यानंतर नवीन वादाला तोंड फुटले. यानंतर विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपशासित केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. यातच आता भाजपच्याच एका नेत्याने स्टेडियमला दिलेले नरेंद्र मोदींचे नाव गुजरात सरकारने मागे घ्यावे, असा सल्ला दिला आहे. (bjp leader subramanian swamy suggested gujarat govt withdraw narendra modi name stadium)

भारतीय जनता पक्षाचे (भाजप) राज्यसभेतील खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी एक ट्विट करून गुजरात सरकारला याबाबत सल्ला दिला आहे. ''गुजरातचा जावई या नात्याने राज्यातील अनेकांनी मला सरदार पटेल स्टेडियमचे नाव बदलल्याबाबत मला विचारणा केली. गुजरात सरकारने आपली चूक सुधारावी आणि स्टेडियमला दिलेले नरेंद्र मोदी यांचे नाव मागे घ्यावे. स्टेडियमला नाव देण्यापूर्वी नरेंद्र मोदी यांची परवानगी घेतली नव्हती, हेदेखील गुजरात सरकारने सर्वांसमोर स्पष्ट करावे'', असे सुब्रमण्यम स्वामी यांनी  आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 

सच कितनी खूबी से सामने आता है

राहुल गांधी यांनी स्टेडियमच्या नावावरून टीका करताना म्हटले होते की, सत्य किती चांगल्या प्रकारे समोर येते. नरेंद्र मोदी स्टेडियम - अडानी अँड - रिलायन्स अँड जय शाह यांच्या अध्यक्षतेखाली! #HumDoHumareDo."

ब्रिटन, ब्राझीलनंतर आता न्यूयॉर्कमध्ये कोरोनाचा नवा प्रकार; अधिक तीव्र आणि घातक

भाजपा सरकारचा निर्णय संतापजनक

गुजरातमधील पाटीदार समाज आणि काँग्रेसचे नेते हार्दिक पटेल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून मोटेरा स्टेडियमच्या नावाला विरोध दर्शवला आहे. तसेच, भाजपा सरकारचा हा निर्णय संतापजनक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले होते. जगातील सर्वांत मोठ्या क्रिकेट स्टेडियमच नाव बदलून नरेंद्र मोदी स्टेडियम ठेवण्यात आले. हा सरदार पटेल यांचा अपमान नाही का? सरदार पटेल यांच्या नावाने मत मागणारी भाजपा, आता सरदार साहेबांचा अपमान करत आहे. गुजरातची जनता सरदार पटेल यांचा अपमान सहन करणार नाही, असे हार्दिक पटेल यांनी म्हटले होते.

योगी आदित्यनाथ आणि राहुल गांधी हे एकाच माळेचे मणी: पिनराई विजयन 

दरम्यान, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते जगातील सर्वांत मोठ्या आणि अत्याधुनिक क्रिकेट स्टेडियमचे उद्घाटन करण्यात आले. या स्टेडियमचे नाव सरदार पटेल स्टेडियमऐवजी नरेंद्र मोदी स्टेडियम करण्यात आले. हे स्टेडियम सरदार वल्लभभाई पटेल स्पोर्ट्स एन्क्लेव्हचा भाग आहे. जगातील सर्वांत मोठ्या स्टेडियममध्ये तब्बल ११ मध्यवर्ती खेळपट्ट्या आहेत. मोटेरा स्टेडियमच्या पुनर्बांधणीचे काम सध्या बीसीसीआय सचिव असलेले जय शाह हे राज्य संघटनेचे अध्यक्ष असताना सुरू झाले. 

Web Title: bjp leader subramanian swamy suggested gujarat govt withdraw narendra modi name stadium

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.