शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
3
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
4
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
5
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
6
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
7
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
8
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
9
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
10
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
11
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
12
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
13
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
14
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
15
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
16
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
17
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
18
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
19
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
20
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
Daily Top 2Weekly Top 5

'सीएनपी' वाल्यांना जीडीपीचा अर्थ कधीच समजणार नाही, राहुल गांधींना भाजपचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2021 19:49 IST

नोटाबंदी झाल्यापासून राहुल गांधी नेहमीच अस्वस्थ दिसून आले आहेत. आजही राहुल गांधी नोटाबंदीमुळे अस्वस्थच होते. साहजिकच, नोटाबंदीमध्ये गांधी कुटुंब आणि काँग्रेस पक्षाने खूप पैसा गमावला असेल, असेही संबित पात्रा म्हणाले.

नवी दिल्ली - जीडीपीमध्ये जोरदार वाढ झाल्यानंतर, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महागाईवरून केंद्र सरकारवर हल्ला चढवला आहे. जीडीपी वाढण्याचा अर्थ सांगत ते म्हणाले, याचा अर्थ गॅस, डिझेल आणि पेट्रोलच्या किंमती वाढणे असा आहे. राहुल गांधी यांच्या या वक्तव्यावरून भाजपचे प्रवक्ता संबित पात्रा यांनीही त्यांना टोला लगावला आहे. पात्रा यांनी काँग्रेसवर 'सीएनपी'चा आरोप केला आहे.

पात्रा म्हणाले, राहुल गांधी यांनी भ्रमित करण्यासाठी जीडीपीचा व्याख्येचा अपभ्रंश करून ती देशासमोर ठेवली आहे. काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी यांचा विचार करता, 'सीएनपी अर्थात करप्शन, नेपोटिझम आणि पॉलिसी पॅरालिसिस वाल्या लोकांना जीडीपीचा खरा अर्थ कधीही समजू शकत नाही.

कोरोना संकटात मोठा दिलासा; २ दिवसांत मोदी सरकारसाठी ४ गुडन्यूज

पात्रा म्हणाले, काल ऐतिहासिक बातमी आली होती. आर्थिक वर्ष 2021-22 साठी, जीडीपीच्या पहिल्या तिमाहीतील विकास दराचा आकडा समोर आला. तो अभूतपूर्व 20.1 टक्क्यांवर पोहोचला. तो महामारी पूर्वच्या स्थितीत जसा होता तसा झाला. हे केवळ पीएम मोदी यांच्या निर्णायक नेतृत्वाखाली असलेल्या याच सरकारमुळे शक्य झाले.

नोटाबंदी झाल्यापासून राहुल गांधी नेहमीच अस्वस्थ दिसून आले आहेत. आजही राहुल गांधी नोटाबंदीमुळे अस्वस्थच होते. साहजिकच, नोटाबंदीमध्ये गांधी कुटुंब आणि काँग्रेस पक्षाने खूप पैसा गमावला असेल, असेही संबित पात्रा म्हणाले.

नेमकं काय म्हणाले होते, राहुल गांधी -राहुल गांधी आज नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना म्हणाले, "पंतप्रधान मोदी वारंवार सांगतायत GDP वाढतोय. अर्थमंत्रीही म्हणतायत GDP वाढतोय. ते नेमके कोणत्या GDP संदर्भात बोलत आहेत, हे मला नंतर समजले. 'Gas-Deisel-Petrol' असा त्याचा अर्थ आहे. त्यांनी जीडीपीबाबत गोंधळ निर्माण केला आहे." 

खूशखबर! Retirement चं वय अन् Pension ची रक्कम वाढण्याची शक्यता;  मोदी सरकारनं तयार केली खास योजना!मोदी सरकारने गॅस, डिझेल आणि पेट्रोलच्या माध्यमाने तब्बल २३ लाख कोटी कमावले -"मोदी सरकारने गॅस, डिझेल आणि पेट्रोलच्या माध्यमाने तब्बल २३ लाख कोटींची कमाई केली आहे. हा पैसा नेमका गेला कुठे?", असा सवालही राहुल गांधी यांनी सरकारला विचारला. देशात डिमॉनिटायझेशन आणि मॉनिटायझेशन एकाच वेळी सुरू आहे. मोदींच्या निवडक चार-पाच मित्रांचे मॉनिटायझेशन होत आहे आणि देशातील शेतकरी, कामगार, छोटे दुकानदार, एमएसएमई, नोकरदार वर्ग, सरकारी कर्मचारी आणि इमानदार उद्योगपतींचे डिमॉनिटायझेशन सुरू आहे, असा टोलाही राहुल यांनी यावेळी लगावला होता. 

 

टॅग्स :Sambit Patraसंबित पात्राRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाcongressकाँग्रेस