शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
2
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
3
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
4
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
5
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
6
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
7
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
8
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
9
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
10
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
11
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
12
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
13
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
14
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
15
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
16
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
17
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
18
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
19
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
20
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत ही तर पाकिस्तानची इच्छा- भाजपा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2018 2:45 PM

राहुल गांधींसाठी पाकिस्तानमधून निवडणूक प्रचार केला जात असल्याचा भाजपाचा आरोप

नवी दिल्ली: राफेल डीलवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर वारंवार निशाणा साधणाऱ्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर आता भाजपानं टीका केली आहे. राहुल गांधींसाठीपाकिस्तानकडून निवडणूक प्रचार केला जात असल्याचा गंभीर आरोप भाजपानं केला आहे. भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी पत्रकार परिषद घेत राहुल गांधींवर घणाघाती हल्ला चढवला. यावेळी त्यांनी पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांच्या ट्विटचा संदर्भ दिला. पाकिस्तानच्या माजी माहिती आणि प्रसारण मंत्र्यांनी राहुल गांधींच्या ट्विटचा वापर केल्याचं संबित पात्रा म्हणाले. 'राहुल गांधी यांनी मोदींवर टीका करणाऱ्या ट्विटचा आधार घेत आधी पाकिस्तानच्या माजी माहिती आणि प्रसारण मंत्र्यांनी ट्विट केलं. त्यानंतर माजी गृहमंत्र्यांनी ट्विट करत मोदींवर निशाणा साधला. मोदी राहुल गांधींना घाबरले आहेत. राहुलच भारताचे पुढील पंतप्रधान असतील, असं पाकिस्तानचे माजी गृहमंत्री म्हणतात. त्यामुळे राहुल गांधींसाठी पाकिस्तानकडून निवडणूक प्रचार केला जात आहे, हे स्पष्ट होतं,' असं संबित पात्रा म्हणाले. याआधी पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी एका ट्विटमध्ये मोदींचा उल्लेख खुजा माणूस असा केला होता, याची आठवण संबित पात्रांनी करुन दिली. 'राहुल गांधींनी पुढे जावं, असं वाटणारे लोक कोण आहेत? राहुल गांधींनी देशाचं नेतृत्व करावं, असं भ्रष्टाचारी, घराणेशाही मानणाऱ्या, लांगुलचालन करणाऱ्यांना वाटतं,' असं पात्रा पुढे म्हणाले. जे लोक सत्याच्या बाजूनं आहेत, त्या लोकांना मोदी पुढे जावेत असं वाटतं, असं संबित पात्रा यांनी म्हटलं. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेसPakistanपाकिस्तान