वरूण गांधींना भाजपाने दिला दणका

By Admin | Updated: February 22, 2017 20:25 IST2017-02-22T20:25:15+5:302017-02-22T20:25:15+5:30

उत्तर प्रदेशच्या सुलतानपूर येथून खासदार असलेले भाजपाचे नेते वरूण गांधी यांना पक्षाने धक्का

BJP has given Varun Gandhi the responsibility | वरूण गांधींना भाजपाने दिला दणका

वरूण गांधींना भाजपाने दिला दणका

ऑनलाइन लोकमत

सुलतानपूर, दि. 22 -उत्तर प्रदेशच्या सुलतानपूर येथून खासदार असलेले भाजपाचे नेते वरूण गांधी यांना पक्षाने धक्का दिला आहे. उत्तर प्रदेशमध्ये सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या सहाव्या आणि सातव्या टप्प्यासाठी स्टार प्रचारकांच्या यादीतून त्यांना वगळलं आहे. काल इंदूरमध्ये एका कार्यक्रमात केलेल्या भाषणात वरूणने केंद्र सरकारवर अप्रत्यक्ष टीका केली होती.  
 
पहिल्या आणि दुस-या टप्प्यातील निवडणुकांवेळी स्टार प्रचारकांच्या यादीत वरूण गांधींचं नाव नव्हतं. मात्र, यानंतर चौथ्या आणि पाचव्या टप्प्याच्या वेळी त्यांचं नाव ऐनवेळी सामिल करण्यात आलं. आता भाजपाने सहाव्या आणि सातव्या टप्प्यातील प्रचारासाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली असून त्यामधून वरूण गांधी यांना वगळण्यात आलं आहे. त्यांच्या जागी केंद्रीय मंत्री वरूण सिन्हा यांची वर्णी लागली आहे.   
 
 
 

Web Title: BJP has given Varun Gandhi the responsibility