मुख्यमंत्री सोरेन यांच्याविरुद्ध भाजपचा एफआयआर

By Admin | Updated: December 19, 2014 22:57 IST2014-12-19T22:57:03+5:302014-12-19T22:57:03+5:30

दुमका (झारखंड): झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी दुमका येथील आमच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केल्याचा आरोप भाजपने एका तक्रारीत केला असून त्याबाबत दुमका पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदविण्यात आला आहे.

BJP FIR lodged against Chief Minister Soren | मुख्यमंत्री सोरेन यांच्याविरुद्ध भाजपचा एफआयआर

मुख्यमंत्री सोरेन यांच्याविरुद्ध भाजपचा एफआयआर

मका (झारखंड): झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी दुमका येथील आमच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केल्याचा आरोप भाजपने एका तक्रारीत केला असून त्याबाबत दुमका पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदविण्यात आला आहे.
गुरुवारी रात्री सोरेन आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यालयावर हल्ला करीत नासधूस केल्याची तक्रार भाजपचे निवडणूक निरीक्षक मृणाल यांनी केली. भाजपचे दुमका येथील उमेदवार लुईस मरांडी यांनी पक्ष कार्यालयासमोर धरणे देत या प्रकरणाकडे लक्ष वेधले. या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

Web Title: BJP FIR lodged against Chief Minister Soren