VIDEO : भाजपा नगरसेवकाची दादागिरी, पोलीस अधिकाऱ्याला बेदम मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2018 13:11 IST2018-10-20T13:09:11+5:302018-10-20T13:11:53+5:30

उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यातील एका भाजपाच्या नगरसेवकाने पोलीस अधिकाऱ्याला मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.

bjp corporator thrashed policeman in meerut | VIDEO : भाजपा नगरसेवकाची दादागिरी, पोलीस अधिकाऱ्याला बेदम मारहाण

VIDEO : भाजपा नगरसेवकाची दादागिरी, पोलीस अधिकाऱ्याला बेदम मारहाण

मेरठ : उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यातील एका भाजपाच्या नगरसेवकाने पोलीस अधिकाऱ्याला मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.

पोलीस अधिकाऱ्याला मारहाण करतानाचा हा व्हिडीओ मेरठमधील कंकरखेडा परिसरातील आहे. येथील एका हॉटेलमध्ये वादानंतर भाजपा नगरसेवकाने पोलीस अधिकाऱ्याला मारहाण केली आहे. असे सांगण्यात येत आहे की, घटनेच्याआधी पोलीस अधिकारी एका महिला वकिलासोबत हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी आले होते. यावेळी हॉटेलच्या मालकाशी त्यांचा वाद झाला. दरम्यान, आरोपी भाजपा नगरसेवकाला पोलिसांना अटक केली असून चौकशी सुरु आहे.


स्थानिक सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री मेरठमधील कंकरखेडामध्ये असलेल्या एका हॉटेलमध्ये  पोलीस अधिकारी एका महिला वकिलासोबत हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी आले होते. यावेळी हॉटेलचे मालक आणि त्यांच्यामध्ये वाद सुरु झाला. त्यानंतर हॉटेलच्या मालकाने भाजपाचे स्थानिक नगरसेवक मनिष पवार यांना सविस्तर घटनेबाबत कळविले आणि घटनास्थळी बोलाविले. मनिष पवार आल्यानंतर पहिल्यांदा पोलीस अधिकाऱ्यासोबत हुज्जत घातली आणि त्यानंतर मारहाण करण्यास सुरुवात केली.

दरम्यान, याप्रकरणी नगरसेवक मनिष पवारविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मनिष पवारला अटक केली असून चौकशी सुरु आहे. 
 

Web Title: bjp corporator thrashed policeman in meerut