शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

बिहारमध्ये नितीश कुमारांवरच भाजपचा विश्वास; तरी आमदारांच्या कामाचे होणार मुल्यमापन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2020 12:46 IST

राज्यात विरोधी पक्ष आता विभक्त दिसत असले तरी निवडणुकीच्या काळात भाजपला विरोध कऱण्यासाठी सर्व पक्ष एकत्र येण्याची शक्यता आहे. यामुळे भाजपकडून काळजी घेण्यात येत आहे.

नवी दिल्ली - बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष पुढील तीन महिने आपल्या सर्व आमदारांच्या कार्याचा अहवाल तयार करणार आहे. ज्या ठिकाणी आमदाराविरोधात वातावरण असेल तिथे नवीन चेहऱ्याला संधी देण्यात येणार आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजपला बिहारमधील निवडणुकीची काळजी सतावत आहे. त्यामुळे ही योजना करण्यात आली आहे.

बिहारमध्ये भाजपला मित्रपक्ष असलेल्या जनता दल युनायटेडची साथ मिळालेली आहे. नितीश कुमार यांच्या चेहऱ्यावर निवडणूक लढविण्यासाठी भाजप पूर्णपणे तयार आहे. मात्र संघटनात पक्षाला कमकुवत होऊ द्यायचे नाही, असं धोरण भाजप राबवत आहे. त्यासाठी आमदारांच्या कार्याचा अहवाल तपासला जाणार आहे.

बिहारमध्ये जदयू आणि लोक जनशक्ती पार्टी यांच्यासोबत युती असताना देखील विधानसभा निवडणुकीची लढत खडतर होऊ शकते, असा अंदाज भाजपमधून व्यक्त कऱण्यात येत आहे. राज्यात विरोधी पक्ष आता विभक्त दिसत असले तरी निवडणुकीच्या काळात भाजपला विरोध कऱण्यासाठी सर्व पक्ष एकत्र येण्याची शक्यता आहे. यामुळे भाजपकडून काळजी घेण्यात येत आहे.

महाराष्ट्रातील अनुभव भाजपच्या पाठिशीमहाराष्ट्रात शिवसेनेसोबत निवडणूक लढवूनही भाजपला सत्तेबाहेर बसावे लागले आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्ष सावध झाला आहे. बिहारमध्ये काहीही झालं तरी मुख्यमंत्री नितीश कुमार हेच होतील, असं भाजपने निश्चित केले आहे. मात्र भविष्यात काय होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे भाजप पक्ष संघटनेवर परिणाम होऊ देणार नसल्याचे दिसत आहे. निवडणुकीत भाजपला जदयूच्या तुलनेत कमी जागा मिळण्याची शक्यता आहे.