तुमच्याच पूर्वजांमुळे चीन सुरक्षा परिषदेचा सदस्य, भाजपाचा राहुल गांधींवर पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2019 02:59 PM2019-03-14T14:59:38+5:302019-03-14T15:03:45+5:30

भाजपानं दहशतवादी मसूद अझहर आणि चीनच्या प्रकरणावरून राहुल गांधींवर पलटवार केला आहे.

bjp attacks on congress president rahul gandhi issue of masood azhar and china | तुमच्याच पूर्वजांमुळे चीन सुरक्षा परिषदेचा सदस्य, भाजपाचा राहुल गांधींवर पलटवार

तुमच्याच पूर्वजांमुळे चीन सुरक्षा परिषदेचा सदस्य, भाजपाचा राहुल गांधींवर पलटवार

Next

नवी दिल्ली- भाजपानं दहशतवादी मसूद अझहर आणि चीनच्या प्रकरणावरून राहुल गांधींवर पलटवार केला आहे. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी राहुल गांधींच्या ट्विटवर आक्षेप नोंदवला आहे. जेव्हा देश दुःखात असतो, तेव्हा राहुल गांधी सेलिब्रेशनच्या मूडमध्ये असतात. राजकारणात नेहमीच अंतर ठेवलं पाहिजे. विरोध असतो आणि तो झालाही पाहिजे.

चीननं पुन्हा एकदा जुन्याच नीतीचा वापर केल्यानं राहुल गांधी खूश आहेत काय ?, राहुल गांधींचं ट्विट आता पाकिस्तानमध्ये हेडलाइन होईल. पाकिस्तानी मीडियामध्ये झळकलेली ट्विट आणि कमेंट पाहून राहुल गांधींना आनंद होतो आहे. तुमच्याच पूर्वजांच्या कारणास्तव चीन सुरक्षा परिषदेचा सदस्य आहे, असंही रविशंकर प्रसाद म्हणाले आहेत.


मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याचा प्रस्ताव यावेळी अमेरिका, ब्रिटेन आणि फ्रान्सनं ठेवला होता. चीन सोडल्यास इतर देशांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला होता. चीनच्या या पावलामुळे भारतीय लोक दुःखी आहेत. रविशंकर म्हणाले, भारताला वेदना होत असताना राहुल गांधी आनंदी कसे असतात. चीन सोडल्यास पूर्ण जग भारताबरोबर आहे.
2009मध्ये यूपीए सरकार असतानाही चीननंही असाच नकाराधिकाराचा वापर केला होता. त्यावेळी तुम्ही अशा प्रकारचं ट्विट केलं होतं का, असा सवालही रविशंकर प्रसाद यांनी उपस्थित केला आहे. राहुल गांधीजी तुमचे चीनबरोबर सौहार्दाचे संबंध आहे. डोकलामच्या वादावेळीही तुम्ही चीनच्या दूतावासात गेला होतात. त्यावेळी तुम्ही भारताची परवानगीसुद्धा घेतली नव्हती. मानसरोवर यात्रेवेळीसुद्धा चीन दूतावासातील अधिकारी तुम्हाला भेटण्यासाठी उत्सुक होते. तुमच्या या प्रभावाचा वापर तुम्ही मसूद अझहरला दहशतवादी घोषित करण्यासाठी करायला हवा होता. 

Web Title: bjp attacks on congress president rahul gandhi issue of masood azhar and china

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.