शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
3
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
4
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
5
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
6
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
7
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
8
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
9
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
10
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
11
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
12
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
13
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
14
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
15
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
16
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
17
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
18
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
19
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
20
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर

भाजपनं जाहीर केली कार्यकारणी; तावडे, मुंडेंवर नेतृत्त्वानं सोपवली मोठी जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2021 3:18 PM

भाजपकडून राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर; राज्यातून गडकरी, गोयल, जावडेकर, सहस्रबुद्धे, चित्रा वाघ यांच्या नावांचा समावेश

नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षानं नवीन राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर केली आहे. यामध्ये मनेका गांधी आणि वरुण गांधींना संधी देण्यात आलेली नाही. मागील कार्यकारणीत वरुण आणि मनेका यांचा समावेश होता. मात्र आता त्यांना कार्यकारणीत जागा दिली गेलेली नाही. गेल्या काही महिन्यांपासून वरुण गांधींनी वेगळा सूर लावला आहे. शेतकरी आंदोलन आणि लखीमपूरमधील हिंसाचारावरून त्यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे. त्यामुळेच कार्यकारणीतून त्यांना बाहेरचा रस्ता दाखवल्याचं बोललं जात आहे. दीड वर्षांपूर्वी भाजपमध्ये आलेल्या ज्योतिरादित्य सिंधिया आणि प. बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कमळ हाती घेतलेल्या मिथुन चक्रवर्तींना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान देण्यात आलं आहे.

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, राजनाथ सिंह, अमित शाह, नितीन गडकरी, पियूष गोयल यांचा समावेश आहे. याशिवाय माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, विनय सहस्रबुद्धे, चित्रा वाघ या महाराष्ट्रातील नेत्यांचा समावेश राष्ट्रीय कार्यकारणीत करण्यात आला आहे. काही महिन्यांपूर्वीच जावडेकरांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. तर चित्रा वाघ गेल्या काही महिन्यांपासून सातत्यानं ठाकरे सरकारला विविध मुद्द्यांवरून धारेवर धरत आहेत.

पंकजा मुंडे, विनोद तावडे, सुनील देवधर यांच्यावर महत्त्वाची जबाबदारीपंकजा मुंडेंना काही महिन्यांपूर्वीच राष्ट्रीय सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर आता त्यांच्याकडे मध्य प्रदेशचं प्रभारीपद देण्यात आलं आहे. माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याकडे हरयाणाचं, तर सुनील देवधर यांच्याकडे आंध्र प्रदेशचं प्रभारीपद देण्यात आलं आहे. मध्य प्रदेशात २०२३ मध्ये, तर हरयाणात २०२४ मध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे.

शेलार, मुनंगटीवार यांना राष्ट्रीय स्तरावर संधीविशेष निमंत्रितांमध्ये सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार, लड्डाराम नागवाणींचा समावेश करण्यात आला आहे. राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून सुनील वर्मा, हिना गावित, यांची वर्णी लागली आहे. माजी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचाही समावेश करण्यात आला आहे. राज्य प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांना कायम ठेवण्यात आलं आहे. महाराष्ट्राचे प्रभारी म्हणून सीटी रवी, ओमप्रकाश धुर्वे, जयभान सिंग पवैय्या यांची नियुक्ती कायम ठेवली आहे.

टॅग्स :BJPभाजपाPankaja Mundeपंकजा मुंडेVinod Tawdeविनोद तावडेAshish Shelarआशीष शेलार