शहरं
Join us  
Trending Stories
1
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
2
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
3
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
4
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
5
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
6
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
7
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
8
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
9
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
10
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
11
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
12
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
13
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
14
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
15
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
16
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
18
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
19
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
20
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

बर्थडे पार्टी ठरली अखेरची! भरधाव कार ट्रॉलीवर आदळून भीषण अपघात, चार मित्रांचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 11:00 IST

Accident In Uttar Pradesh: उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खीरीजवळ झालेल्या एका भीषण अपघातात चार मित्रांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तीन जण जखमी झाले आहेत. लखीमपूर खीरी येथील निघासन ढखेरवा मार्गावर हजारा फार्मजवळ भरधाव कार ऊस भरलेल्या ट्रॉलीवर आदळून हा अपघात झाला.

उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खीरीजवळ झालेल्या एका भीषण अपघातात चार मित्रांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तीन जण जखमी झाले आहेत. लखीमपूर खीरी येथील निघासन ढखेरवा मार्गावर हजारा फार्मजवळ भरधाव कार ऊस भरलेल्या ट्रॉलीवर आदळून हा अपघात झाला.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार लखीमपूरमधील  पटेलनगर येथे राहणारा दिग्विजय  वाढदिवसाची पार्टी संपल्यावर मित्राला सोडण्यासाठी कारमधून ढखेरवा येथे जात होता. त्यादरम्यान हजारा फार्मजवळ ही भरधाव कार एका ऊस भरलेल्या ट्ऱॉलीवर आदळली. या अपघातात कारमधील सात जणांपैकी चार जणांचा मृत्यू झाला. तर अन्य तिघेजण गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी जखमींवर उपचार करण्यासाठी त्यांना रुग्णालयात दाखल केले. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले.

ही कार ज्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर आदळली त्या ट्रॅक्टरला उसाने भरलेल्या दोन ट्रॉली जोडलेल्या होत्या. तसेच त्यापैकी एका ट्रॉलीचं चाक पंक्चर झालं होतं. हे चाक दुरुस्त करण्याचं काम सुरू होतं. त्याचवेळी भरधाव कार येऊन ट्रॉलीवर आदळली. या ट्रॉलीच्या मागे कुठलाही सांकेतिक रिफ्लेक्टर नव्हता. त्यामुळे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रॉलीचा अंदाज कारचालकासा आला नाही आणि हा अपघात झाला, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे.  

टॅग्स :AccidentअपघातUttar Pradeshउत्तर प्रदेश