bihar man carved 3 km long canal 30 years rainwater coming down hills gaya laungi bhuiyan | जिद्दीला सॅल्यूट! 70 वर्षांच्या शेतकऱ्यानं डोंगर कापून बनवला 5 किमी लांबीचा कालवा

जिद्दीला सॅल्यूट! 70 वर्षांच्या शेतकऱ्यानं डोंगर कापून बनवला 5 किमी लांबीचा कालवा

बिहारमधील माऊंटन मॅन दशरथ मांझी यांचे नाव प्रसिद्ध आहे. ज्यांनी 22 वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर एक हातोडा आणि छिन्नीसह 360 फूट लांब,  30 फूट रुंद आणि 25 फूट उंच डोंगर कापून रस्ता बनवला. अशाच एका 70 वर्षीय लौंगी भुईया यांनी खेड्यातील शेकडो लोकांच्या अडचणीवर आपल्या कष्टाने मात केली. 30 वर्षांच्या मेहनतीने डोंगर कापून पाच किलोमीटर लांबीचा कालवा बनविला. आता डोंगर आणि पावसाचे पाणी कालव्यातून शेतात जात आहे. ज्यामुळे तीन गावांतील नागरिकांना याचा फायदा होत आहे.

बिहार, गया येथील रहिवासी लौंगी भुईया यांनी कठोर परिश्रम घेऊन एक अनोखं उदाहरण समोर ठेवले आहे, जे कायम लक्षात ठेवले जाईल. 30 वर्ष कष्ट करून त्याने डोंगरावरून पडणा-या पावसाचे पाणी गोळा करून ते गावात आणलं. तो दररोज घरातून निघून थेट जंगलावर जात होता आणि एकट्यानं त्यांनी कालवा बांधण्यास सुरुवात केली. कोठीलवा गावचा रहिवासी असलेला लौंगी भुईया आपला मुलगा, सून आणि पत्नीसमवेत राहतो. भुईयांनी सांगितले की, पहिल्यांदा कुटुंबातील लोकांनी त्याला खूप विरोध केला. पण त्याने ऐकले नाही व कालवा खोदण्याचं काम सुरूच ठेवलं.

वास्तविक या भागात पाण्याअभावी लोक केवळ मका आणि हरभरा पिकवत असत. अशा परिस्थितीत गावातील सर्व तरुण चांगल्या नोकरीच्या शोधात खेड्यातून शहरात जात होते. कामाच्या शोधात बरेच लोक खेड्यापासून दूर गेले. त्याच वेळी त्यांच्या मनात असा विचार आला की, इथे पाण्याची व्यवस्था असेल तर लोकांचे स्थलांतर रोखता येईल. कठोर परिश्रमानंतर आज कालवा तयार झाला असून, या भागातील तीन गावांतील तीन हजार लोकांना याचा फायदा होत आहे.

ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, जेव्हा केव्हा आम्ही पाहिलं, तेव्हा ते घरात कमी आणि जंगलात जास्त दिसले. त्याचबरोबर लौंगी भुईया यांचे म्हणणे आहे की, जर सरकार काही मदत देऊ शकली तर शेतीसाठी ट्रॅक्टरसारख्या सुविधा मिळू शकतील. शेतीसाठी नापीक जमीन सुपीक बनवू शकेल, ज्यामुळे लोकांना खूप मदत होईल. त्याच वेळी लौंगी भुईया यांच्या कार्यामुळे प्रत्येक जण प्रभावित झाला आहे. आज त्यांचे नाव देशाच्या कानाकोप-यात घेतले जात आहे. प्रत्येक जण त्यांना अभिवादन करीत आहे. ज्यांनी 30 वर्षांत पाच फूट रुंद आणि तीन फूट खोल कालवा बनविला आणि हजारो लोकांच्या अडचणी सोडवल्या.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: bihar man carved 3 km long canal 30 years rainwater coming down hills gaya laungi bhuiyan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.