Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 18:46 IST2025-11-11T18:45:43+5:302025-11-11T18:46:37+5:30
Bihar Election Exit Poll 2025 : बिहार निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज संपले असून या टप्प्यात रेकॉर्डब्रेक मतदान झाले आहे. आज बिहारमध्ये सायंकाळी ५ वाजेपर्यंत ६७ टक्के मतदान झाले आहे, हा आकडा ७० टक्क्यांवर जाण्याची शक्यता आहे.

Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतदानानंतर आता संपूर्ण देशाचे लक्ष एक्झिट पोलच्या अंदाजाकडे लागले आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) सत्ता कायम राखणार की राष्ट्रीय जनता दल (RJD) प्रणित इंडिया ब्लॉक नऊ वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या नितीश कुमार यांना सत्तेवरून खाली खेचण्यात यशस्वी होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
बिहार निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज संपले असून या टप्प्यात रेकॉर्डब्रेक मतदान झाले आहे. आज बिहारमध्ये सायंकाळी ५ वाजेपर्यंत ६७ टक्के मतदान झाले आहे, हा आकडा ७० टक्क्यांवर जाण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात ६५ टक्क्यांच्या आसपास मतदान झाले होते. यामुळे सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहोचली असून बिहार निवडणुकीचा काय निकाल लागणार याचे एक्झिट पोल जाहीर झाले आहेत.
MATRIZE-IANS एक्झिट पोल...
बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतदानानंतर उत्सुकता वाढवणाऱ्या एक्झिट पोलचे आकडे आता समोर येत आहेत. MATRIZE-IANS या सर्वेक्षणाने जारी केलेल्या एक्झिट पोलनुसार, राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) पुन्हा एकदा जोरदार मुसंडी मारत सत्तेत येत असल्याचे संकेत मिळत आहेत. या आकडेवारीनुसार, नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील NDA ला १४७ ते १६७ जागा मिळण्याचा स्पष्ट अंदाज आहे, तर तेजस्वी यादव यांच्या महाआघाडीला केवळ ७० ते ९० जागांवर समाधान मानावे लागू शकते. हा अंदाज NDA ला स्पष्ट आणि मोठे बहुमत मिळवून देत असल्याचे दर्शवतो.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीची अंतिम प्रक्रिया १४ नोव्हेंबर रोजी पार पडेल आणि तेव्हाच बिहारचा खरा 'किंग' कोण हे स्पष्ट होईल.