बिहारच्या कॅबिनेटची २० मिनिटांत मिटिंग संपली, नितीश-तेजस्वी बाजुला बसले पण बोललेही नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2024 01:45 PM2024-01-25T13:45:15+5:302024-01-25T13:45:36+5:30

अर्थसंकल्पासाठी बोलविलेली कॅबिनेट मिटिंग केवळ २० मिनिटे चालली आहे. नितीशकुमार लवकरच इंडिया आघाडीसोडून भाजपाच्या एनडीएत जाण्याच्या शक्यता.

Bihar cabinet meeting ends in 20 minutes, Nitish-Tejaswi sits on the side, but doesn't even speak | बिहारच्या कॅबिनेटची २० मिनिटांत मिटिंग संपली, नितीश-तेजस्वी बाजुला बसले पण बोललेही नाहीत

बिहारच्या कॅबिनेटची २० मिनिटांत मिटिंग संपली, नितीश-तेजस्वी बाजुला बसले पण बोललेही नाहीत

बिहारमध्ये सत्ताधारी पक्षांमध्ये बिनसल्याचा आज उघड उघाड पुरावा मिळाला आहे. नितीशकुमार लवकरच इंडिया आघाडीसोडून भाजपाच्या एनडीएत जाण्याच्या शक्यतेवर आज बिहारच्या कॅबिनेट बैठकीतील वातावरणावरून शिक्कामोर्तब झाले आहे.

अर्थसंकल्पासाठी बोलविलेली कॅबिनेट मिटिंग केवळ २० मिनिटे चालली आहे. या २० मिनिटांत बाजुबाजुला बसून एकदाही नितीशकुमार आणि तेजस्वी यादव यांच्याच बोलणे झाले नाही की कोणत्याही मुद्द्यावर एकमत झाले नाही. 

गेल्या काही दिवसांपासून नितीशकुमार एनडीएच्या पारड्यात उडी मारण्याची चर्चा सुरु आहे. यातच लालुंच्या मुलीने नितीशकुमारांवर टीका केली आहे. नितीशकुमारांनी काल एका कार्यक्रमात परिवारवादावर भाष्य केले आहे. काही जण आपल्या पुढच्या पिढीला राजकारणात स्थिरस्थावर करू इच्छित असल्याचे नितीशकुमार म्हणाले आहेत. तर लालुंच्या मुलीने नीयत मे खोट असे ट्विट करत नीतीश कुमारांवर नाव न घेता टीका केली आहे. 

आजच्या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेण्यासही मनाई करण्यात आल्याचे मुख्यमंत्री सचिवालयाने सांगितले आहे. तर मंत्री सुरेंद्र राम यांनी सांगितले की, मंत्रिमंडळाची बैठक खूपच छोटी होती. कोणत्याही मुद्द्यावर एकमत होऊ शकले नाही, त्यामुळे कोणताही अजेंडा मंजूर झालेला नाही.
मंत्रिमंडळाची बैठकीतून काहीच फलित झाले नाही, यामुळे ही बैठक थांबविण्यात आली. मुख्यमंत्री नितीशकुमार त्यांच्या निवासस्थानी रवाना झाले तर मंत्री त्यांच्या त्यांच्या कामाला निघून गेले. 

Web Title: Bihar cabinet meeting ends in 20 minutes, Nitish-Tejaswi sits on the side, but doesn't even speak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.