शहरं
Join us  
Trending Stories
1
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
2
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
3
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
4
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
5
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
6
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
7
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
8
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
9
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
10
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
11
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
12
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
13
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
14
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
15
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
16
मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे १७ नोव्हेंबरपासून आंदोलन
17
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
18
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
19
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
20
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
Daily Top 2Weekly Top 5

एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 06:54 IST

Bihar Assembly Election Result: बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) विक्रमी विजय मिळवित राजद-काँग्रेस प्रणित महाआघाडीचा अक्षरशः सुपडा साफ केला. २४३ जागांपैकी २०० पेक्षा अधिक जागांवर एनडीएने बाजी मारली. यामुळे बिहारमध्ये पुन्हा एकदा नितीश राज येणार हे जवळपास निश्चित आहे. 

पाटणा - बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) विक्रमी विजय मिळवित राजद-काँग्रेस प्रणित महाआघाडीचा अक्षरशः सुपडा साफ केला. २४३ जागांपैकी २०० पेक्षा अधिक जागांवर एनडीएने बाजी मारली. यामुळे बिहारमध्ये पुन्हा एकदा नितीश राज येणार हे जवळपास निश्चित आहे.

महाआघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असलेले तेजस्वी यादव हे विजयी झाले असले तरी त्यांचा राष्ट्रीय जनता दल आपला करिष्मा दाखवू शकला नाही. निवडणुकीआधी मताधिकार यात्रा काढून वातावरण निर्माण केलेल्या राहुल गांधी यांची जादूही काँग्रेसला तारू शकली नाही. काँग्रेसला दोन अंकी संख्याही गाठता आली नाही. राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांचा जनसुराज पक्षही सपशेल अपयशी ठरला. 

एनडीएचा स्ट्राइक रेट लक्षणीय भाजप तब्बल ८९ जागांवर आघाडी मिळवित अव्वल पक्ष ठरला आहे. बिहारमध्ये प्रथमच भाजपला इतके मोठे यश मिळाले आहे. गेल्या वेळी ४३ जागांवर मर्यादित राहिलेल्या नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाने यंदा ८५ जागांवर यश मिळविले आहे. चिराग पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षानेही २९ जागांपैकी १९ जागांवर विजय मिळविला आहे. भाजपचा स्ट्राइक रेट जवळपास ८९ टक्के तर जदयूचा ८५ टक्क्यांच्या आसपास आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना महायुती सरकारसाठी फलदायी ठरली होती. त्याप्रमाणेच बिहारमध्ये नितीश कुमार यांनी  निवडणुकीआधी सुरू केलेली महिला रोजगार योजना ही एनडीएच्या विजयात निर्णायक ठरली.

बिहारमध्ये मतदारयाद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण अर्थात ‘एसआयआर’वरून राजकीय राळ उठली होती. महाआघाडीने मतचोरी आणि ‘एसआयआर’चा मुद्दा उपस्थित करत एनडीएला लक्ष्य केले. मात्र तो मुद्दा मतदारांना आकर्षित करू शकला नाही. 

ज्याप्रमाणे गंगा नदी बिहारमार्गे बंगालमध्ये पोहोचते, त्याप्रमाणे बिहारच्या विधानसभा निवडणुकांतील विजयाने पं. बंगालमधील भाजपच्या विजयाचा मार्ग मोकळा करून दिला आहे.- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

राज्यातील जनतेने आमच्या सरकारवर विश्वास दाखवत प्रचंड बहुमत दिले आहे. यासाठी मी राज्यातील सर्व मतदारांना वंदन करतो आणि मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो. - नितीश कुमार, बिहारचे मुख्यमंत्री

English
हिंदी सारांश
Web Title : NDA Wins Bihar Again; Grand Alliance Flops; BJP Claims Top Spot

Web Summary : NDA secured a decisive victory in Bihar, surpassing 200 seats and defeating the RJD-Congress led Grand Alliance. BJP emerged as the leading party for the first time, while Nitish Kumar is set to continue as Chief Minister. Women's employment schemes proved beneficial.
टॅग्स :Bihar Assembly Election 2025बिहार विधानसभा निवडणूक २०२५Janta Dal Unitedजनता दल युनायटेडBJPभाजपाNitish Kumarनितीश कुमारNarendra Modiनरेंद्र मोदी