अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली जम्मू काश्मीरमधील सुरक्षेबाबत मोठी बैठक; अफगाण संकटादरम्यान बदललेल्या परिस्थितीवरही चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2021 11:46 PM2021-09-09T23:46:38+5:302021-09-09T23:46:38+5:30

Home Minister Amit Shah : गृहमंत्री अमित शाह यांनी जम्मू काश्मीरमधील सुरक्षा स्थिती आणि त्या ठिकाणी लागू करण्यात येत असलेल्या विकासाच्या कामांचा आढावा घेतला.

Big meeting on Jammu and Kashmir under the leadership of Amit Shah; Also discuss the situation that has changed during the Afghan crisis | अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली जम्मू काश्मीरमधील सुरक्षेबाबत मोठी बैठक; अफगाण संकटादरम्यान बदललेल्या परिस्थितीवरही चर्चा

अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली जम्मू काश्मीरमधील सुरक्षेबाबत मोठी बैठक; अफगाण संकटादरम्यान बदललेल्या परिस्थितीवरही चर्चा

Next
ठळक मुद्देशाह यांनी जम्मू काश्मीरमधील सुरक्षा स्थिती आणि त्या ठिकाणी लागू करण्यात येत असलेल्या विकासाच्या कामांचा आढावा घेतला.

अफगाणिस्तानातील (Afghanistan) संकटाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयात जम्मू काश्मीरबाबत गुरूवारी उच्चस्तकीय बैठक बोलावण्यात आली होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Home Minister Amit Shah) यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या बैठकीत केंद्र आणि क्रेंद्रशासित प्रदेशातील अनेक वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. 

या उच्चस्तरीय बैठकीत जम्मू काश्मीरचे उप-राज्यपाल मनोज सिन्हा, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल, लष्कर प्रमुख एमएम नरवणे, केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला, आयबीचे संचालक अरविंद कुमार, रॉचे प्रमुख सामंत गोयल, BSF चे डीजी पंकज सिंह आणि CRPF चे प्रमुख कुलदीप सिंग यांनी सहभाग घेतला होता. ही बैठक जवळपास दोन तास सुरू होती.

 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अफगाणिस्तानवरतालिबानच्या ताब्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये स्थिती कशी बदलली आणि त्या ठिकाणी सुरक्षा कशा प्रकारे ठेवण्यात येत आहे, यावरदेखील बैठकीत चर्चा झाली. याशिवाय जम्मू काश्मीरमधील सुरक्षा स्थिती आणि त्या ठिकाणी राबवण्यात येत असलेल्या प्रकल्पांचा अमित शाह यांनी आढावा घेतला. तालिबानद्वारे अफगाणिस्तानात अंतरिम सरकार स्थापन करण्याच्या घोषणेच्या दोन दिवसांनंतर केंद्र सरकार आणि केंद्र शासित प्रदेशाच्या प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यासोबत ही महत्त्वाची बैठक पार पडली. 

Web Title: Big meeting on Jammu and Kashmir under the leadership of Amit Shah; Also discuss the situation that has changed during the Afghan crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.