मोठी दुर्घटना: विहीर कोसळून अनेक जण आत अडकले, आतापर्यंत १० जणांना वाचवले, बचावकार्य सुरू...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2021 11:46 PM2021-07-15T23:46:03+5:302021-07-15T23:47:18+5:30

Accident In Madhya Pradesh:

Big accident: Many people got trapped inside the well, so far 10 people have been rescued, rescue work is underway ... | मोठी दुर्घटना: विहीर कोसळून अनेक जण आत अडकले, आतापर्यंत १० जणांना वाचवले, बचावकार्य सुरू...

मोठी दुर्घटना: विहीर कोसळून अनेक जण आत अडकले, आतापर्यंत १० जणांना वाचवले, बचावकार्य सुरू...

googlenewsNext

भोपाळ - मध्य प्रदेशमधील विदिशा जिल्ह्यातीस गंजबसौदा येथे आज मोठी दुर्घटना घडली आहे.  येथे लालपठारमध्ये एका विहिरीत अनेक लोक पडले. दरम्यान, या दुर्घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफच्या पथकाला घटनास्थळी बोलावण्यात आले. पोलीस आणि एनडीआरएफची पथके मदतकार्यासाठी घटनास्थळी दाखल झाली आहेत. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान मदतकार्यावर लक्ष ठेवून आहेत. विहीर कोसळून किती लोक आत अडकले आहेत याबाबत निश्चित माहिती मिळालेली नाही. मात्र किमान १५ जण अडकले असावेत असा अंदाज आहे. बचावकार्यादरम्यान, १० जणांना बाहेर काढण्यात यश आल्याचे वृत्त आहे. आता या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश शिवराजसिंह चौहान यांनी दिले आहेत. (Many people got trapped inside the well in Madhya Pradesh, so far 10 people have been rescued, rescue work is underway)

या दुर्घटनेबाबत सांगण्यात आले की, येथील एका विहिरीमध्ये मुलगा पडला होता. त्याला वाचवण्यासाठी गावातील लोक विहिरीजवळ गोळा झाले. ला लोकांचे वजन आणि दबाव वाढल्याने विहिरीजवळची माती दबली आणि विहीर कोसळली. त्यामुळे अनेक जण त्यात अडकले. दुर्घटनेनंतर घटनास्थळावर आरडाओरड आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. त्यात अंधार असल्याने मदतकार्यामध्येही अडचणी येत आहेत.

घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी घटनास्थळावर एनडीआरएफ एपी च्या एका पथकाला रवाना केले. प्रभारी मंत्री विश्वास सारंग हेसुद्धा घटनास्थळावर पोहोचत आहेत. दरम्यान, मी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. तसेच अडकलेल्या लोकांच्या बचावासाठी यंत्रसामुग्री पाठवली जात आहे, असे ट्विट शिवराज सिंह चौहान यांनी केले आहे. 

या दुर्घटनेत किती लोकांचा मृत्यू झाला याबाबत काही सांगता येणार नाही. मात्र ही घटना खूप दु:खद आहे, असेही शिवराजसिंह चौहान यांनी सांगितले. दरम्यान, विदिशा येथे आज मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या दत्तक मुलींचा विवाह सोहळा होता. त्याचवेळी संध्याकाळी ही दुर्घटना झाल्याने मुख्यमंत्र्यांनी विवाह स्थळावरच कंट्रोल रूम बनवला. तिथून मुख्यमंत्री अधिकाऱ्यांकडून क्षणाक्षणाची अपडेट घेत होते.  

Web Title: Big accident: Many people got trapped inside the well, so far 10 people have been rescued, rescue work is underway ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.