शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
8
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
9
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
10
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
11
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
12
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
13
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
14
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
15
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
16
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
17
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
18
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

जगभर पाहिला गेला अयोध्येतील राममंदिर भूमिपूजनाचा सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2020 1:23 AM

अमेरिका, ब्रिटनसह अनेक देशांत पूजा, दिव्यांची आरास करून जल्लोष

नवी दिल्ली : अयोध्येतील राममंदिर भूमिपूजनाचा सोहळा दूरचित्रवाणीवरून अमेरिका, ब्रिटनसह जगभरात मोठ्या भक्तिभावाने पाहिला गेला. एवढेच नाही, तर जगभरातील भारतीय समुदायाने घरोघरी सजावट करून पूजा, आरती केली. अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, आॅस्ट्रेलिया, इंडोनेशिया, थायलँड, नेपाळसह जगातील अनेक देशांत दिवे लावून हा सोहळा दिवाळीसारखाच साजरा केला. भारतासोबत अवघे जग ‘जय श्रीराम’ या जयघोषाने राममय झाले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी, ५ आॅगस्ट रोजी राममंदिराचे भूमिपूजन करण्यात आले. या सोहळ्याचे दूरदर्शनवरून थेट प्रक्षेपण करण्यात करण्यात आले होते. एशियन न्यूज इंटरनॅशनल आणि असोसिएटस प्रेस टेलिव्हिजन न्यूजच्या माध्यमातून जगभरात या ऐतिहासिक सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. दूरदर्शनच्या डीडी न्यूजने स्वतंत्रपणे या सोहळ्याची दृश्ये आशिया प्रशांत क्षेत्रातील देशांसाठी प्रसारित केले.मुस्लिम समुदाय राममंदिराविरुद्ध नाहीमुस्लिम समुदाय राममंदिराविरुद्ध नाही, हा सौहार्दपूर्ण संदेश देण्यासाठी मी राममंदिर भूमिपूजन सोहळ्याला गेलो होतो, असे इक्बाल अन्सारी यांनी स्पष्ट केले. अयोध्या खटल्यातील पक्षकार दिवंगत हाशीम अन्सारी यांचे इक्बाल अन्सारी पुत्र आहेत. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मान्य करणे, हे आमचे कर्तव्यच आहे. हिंदू बांधव आमच्यासोबत आहेत आणि आम्ही या आनंदाच्या क्षणी त्यांच्यासोबत आहोत, असे इक्बाल अन्सारी यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Ayodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिर