शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
2
SSC Result: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
3
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
4
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
5
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
6
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
7
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
8
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लागले लक्ष
9
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
10
Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
11
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
12
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
14
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
15
बाप रे! काव्या मारनच्या SRH संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला ११३ कोटींची ऑफर; मेगा डीलसाठी तो IPL सोडणार?
16
४० रोडरोमिओंना अद्दल घडवणारी लेडी सिंघम; सरपंचाची लेक झाली धडाकेबाज IPS ऑफिसर
17
“विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करा”: चंद्रकांत पाटील
18
चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा
19
Mumbai Watermelon Case: कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं?
20
ऑपरेशन सिंदूरदरम्यान, पाकिस्तानचे ११ तळ उडवले, १३ विमाने पाडली, तसेच..., वर्षभरानंतर तिन्ही सैन्यदलांनी आकडाच सांगितला    
Daily Top 2Weekly Top 5

भिष्णूर....

By admin | Updated: December 20, 2014 22:28 IST

गारपीटग्रस्त शेतकरी आर्थिक विवंचनेत

गारपीटग्रस्त शेतकरी आर्थिक विवंचनेत
नुकसानभरपाईची मागणी : कपाशीवर लाल्याचा प्रादुर्भाव
भिष्णूर : परिसरातील पिकांचे गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. असे असतानाही अधिकाऱ्यांनी नुकसान झाले नसल्याचा अहवाल शासनाकडे सादर केला. त्यामुळे परिसरातील शेतकरी मदतीपासून वंचित झाले. त्यातच यंदा कपाशीवर मोठ्या प्रमाणात लाल्याचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.
परिसरातील शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसंदर्भात १२ डिसेंबरला रास्ता रोको आंदोलन केले. त्यावेळी तहसीलदारांनी आंदोलनस्थळी भेट देऊन मागण्या शासनाकडे पोहविण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, राज्यात वेगवेगळ्या भागात केंद्राची पथके पाहणीस येऊनही या भागातील गारपीटग्रस्तांना अद्यापही मदत न मिळाल्याने शेतकरी संताप व्यक्त करीत आहेत.
भिष्णूर परिसरात ५ ऑक्टोबर २०१४ ला मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. यात संत्रा, मोसंबी, कपाशी, तूर व भाजीपाला पिके जमीनदोस्त झाली. त्यामुळे शेतकऱ्यांना भरीव मदत व कायमस्वरूपी योजना राबवून शेतकऱ्यांना धीर देण्याची गरज होती. परंतु शासकीय अधिकाऱ्यांनी नुकसान न झाल्याचे दाखवून या परिसरातील शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक नुकसानभरपाईपासून वंचित ठेवल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
गारपीटग्रस्त भागातील नुकसानीचे प्रमाण तालुका कृषी अधिकारी, तलाठी कार्यालयाने चुकीचे दिल्याने शेतकरी संताप व्यक्त करीत आहेत. याबाबत कृषी अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, प्राथमिक अहवालामध्ये पिकांचे ५० टक्क्यांच्या आत नुकसान झाले आहे, असे सांगण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात काही शेतकऱ्यांनी पिके घरी आणलीच नाही. ती पूर्णत: भुईसपाट झाली. त्यामुळे या परिसरातील नुकसानीचा पुन्हा सर्व्हे करून नवीन अहवालानुसार नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. या भागातील भिष्णूर, थाटुरवाडा, नायगाव, खुशालपूर, पारडसिंगा, खापरी (केने), विवरा, रोहणा आदी गावातील शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले. परंतु, त्यांना अद्यापही नुकसानभरपाईची प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यातच कपाशीवर लाल्याचा प्रादुर्भाव झाला असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
या भागातील वीज वितरण कंपनीला कृषिपंपांचे बिल माफ करण्याचे आदेश न मिळाल्यामुळे वीज बिलांच्या थकबाकीसाठी वीज वितरण कंपनीचे अधिकारी, कर्मचारी शेतकऱ्यांकडे तगादा लावत आहेत. अनेक शेतकऱ्यांकडील वीज जोडणी तोडल्यामुळे त्यांना ओलितापासून वंचित व्हावे लागत आहे. यावरही शासनाने तोडगा काढावा, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. (वार्ताहर)