‘पांडुरंग’च्या संचालक पदावरून ‘भैरू’ नाराज वर्णी लागली नाही: मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदाचा दिला राजीनामा

By Admin | Updated: March 14, 2015 23:45 IST2015-03-14T23:45:40+5:302015-03-14T23:45:40+5:30

14भैरू वाघमारे

'Bhairu' did not get angry because of the 'Pandurang' director's resignation: the resignation of central bank's director | ‘पांडुरंग’च्या संचालक पदावरून ‘भैरू’ नाराज वर्णी लागली नाही: मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदाचा दिला राजीनामा

‘पांडुरंग’च्या संचालक पदावरून ‘भैरू’ नाराज वर्णी लागली नाही: मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदाचा दिला राजीनामा

14
ैरू वाघमारे
पंढरपूर -
र्शीपूर (ता. माळशिरस) येथील र्शी पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत परिचारक गट बिनविरोध निवडून आला असला तरी संचालक पदासाठी नव्याने इच्छुक असलेल्यांना उमेदवारी न मिळाल्याने अनेक जण नाराज झाले आहेत. याचाच एक भाग असा झाला की, कोर्टीतील एका कार्यकर्त्याला संचालकपदी संधी मिळाली नाही म्हणून परिचारक गटाच्या भैरू वाघमारे यांनी मध्यवर्ती बॅँकेच्या संचालक पदाचा राजीनामा देऊन नाराजी व्यक्त केली आहे.
पंढरपूर तालुक्यातील कोर्टी येथील भैरू वाघमारे हे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या इतर मागास वर्ग या मतदारसंघातून संचालक झाले होते. विधानसभेच्या निवडणुकीत भैरू वाघमारे यांच्या कार्यकर्त्यांनी चांगले काम केले होते. यामुळे र्शी पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये खर्डी गटातून कोर्टीतील एका कार्यकर्त्याला संचालक पदासाठी उमेदवारी मिळावी, असे मत भैरू वाघमारे यांचे होते. त्यामुळे त्यांनी कार्यकर्त्याचा उमेदवारी अर्जदेखील दाखल केला होता. परंतु अचानक परिचारक यांच्याकडून आदेश आल्याने त्यांना अर्ज काढून घ्यावा लागला.
यामुळे भैरू वाघमारे यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे व घरगुती अडचणीमुळे यापुढे मी बॅँकेच्या संचालक मंडळावर संचालक म्हणून काम करु शकत नाही. त्यास्तव मी बॅँकेच्या संचालक पदाचा राजीनामा देत आहे, असा अर्ज दाखल केला आहे.

Web Title: 'Bhairu' did not get angry because of the 'Pandurang' director's resignation: the resignation of central bank's director