अमेरिका आणि भारत यांच्यात नुकताच मोठा व्यापार करारा झाला आहे. यावरून आता लोकसभेतील विरोधी पक्षनेते तथा काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला असून, हा व्यापार करार म्हणजे, भारतीय शेतकऱ्यांशी केलेला 'विश्वासघात' असल्याचे म्हटले आहे. एढेच नाही तर, त्यांनी सोशल मीडियावर एक लांबलचक पोस्ट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ५ प्रश्न विचारले आहेत आणि सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे.
राहुल गांधी यांचे ५ प्रश्न... - १. DDG आयातीचा नेमका अर्थ काय? भारतीय गुरांना GM अमेरिकन मक्यापासून बनवलेले डिस्टिलर धान्य खायला दिले जाणार का? यामुळे आपली दुग्ध उत्पादने अमेरिकन कृषी उद्योगावर अवलंबून राहणार नाहीत का?
२. जर आपण जीएम सोया तेलाच्या आयातीला परवानगी दिली, तर मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थानमधील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे काय होणार? ते किमतींचा हा धक्का कसा सहन करतील?
३. जेव्हा आपण "अतिरिक्त उत्पादने" म्हणता, तेव्हा त्यात कशाचा समावेश होतो? हा कालांतराने डाळी आणि इतर पिके अमेरिकन आयातीसाठी खुले करण्याचा संकेत आहे का?
४. बिगर-व्यापारी अडथळे (Non-trade barriers) हटवण्याचा अर्थ काय? भविष्यात भारतावर जीएम पिकांवरील आपली भूमिका शिथील करण्यासाठी, खरेदी कमकुवत करण्यासाठी किंवा एमएसपी आणि बोनस कमी करण्यासाठी दबाव टाकण्यात येईल का?
५. हा दरवाजा एकदा खुला झाला की, दरवर्षी तो आणखी उघडण्यापासून आपण कसे रोखणार? हे रोखले जाईल का, की प्रत्येक करारात हळूहळू आणखी पिकांचा यात समावेश होईल?
शेतकऱ्यांना स्पष्टिकरण मिळायला हव -या प्रश्नांव्यतिरिक्त, "शेतकऱ्यांना स्पष्टीकरण मिळायला हवे. ही केवळ आजची बाब नाही, हे भविष्याशी संबंधित आहे, असे म्हणत, आपण दुसऱ्या देशाला भारताच्या कृषी उद्योगावर दीर्घकालीन नियंत्रण मिळवू देत आहोत का? असा प्रश्नही राहुल गांधी यांनी उपस्तित केला.
Web Summary : Rahul Gandhi criticizes the US-India trade deal, calling it a betrayal of Indian farmers. He posed five questions to PM Modi regarding the impact on dairy farmers, soybean producers, GM crops, and long-term control over India's agriculture.
Web Summary : राहुल गांधी ने भारत-अमेरिका व्यापार समझौते की आलोचना करते हुए इसे भारतीय किसानों के साथ विश्वासघात बताया। उन्होंने डेयरी किसानों, सोयाबीन उत्पादकों, जीएम फसलों और भारत की कृषि पर दीर्घकालिक नियंत्रण पर पीएम मोदी से पांच सवाल पूछे।