शहरं
Join us  
Trending Stories
1
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
2
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
3
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
4
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
5
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
6
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
7
सत्ता मिळविण्यासाठी उद्धवसेनेने प्रतिष्ठा घालविली; मुख्यमंत्री शिंदेंची घणाघाती टीका
8
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
9
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
10
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
11
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
12
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
13
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
14
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
15
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
16
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती
17
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
18
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
19
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
20
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक

CoronaVirus : पश्चिम बंगालमध्ये निवडणूक आयोगानं घातली रोड शोवर बंदी, सभांसाठीही असेल लोकांची मर्यादा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2021 10:23 PM

केवळ कोरोना सुरक्षेसंदर्भात परिपत्र जारी करने आणि बैठका घेणे पुरेसे नाही, असे मुख्य न्यायाधीश टी बी एन राधाकृष्णन यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने तीन जनहित याचिकांवर सुनावणी करताना म्हटले होते.

कोलकाता - कोरोनाने संपूर्ण देशात धुमाकूळ घातला आहे. यातच पश्चिम बंगालमध्ये निवडणुका होत आहेत. मात्र, आता निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालमध्ये रोड शोवर बंदी घातली आहे. तसेच जनसभांमध्येही आता 500 हून अधिक लोकांना सहभागी होता येणार नाही, असेही निवडणूक आयोगाने म्हटले आहे. तत्पूर्वी कोलकता उच्च न्यायालयाने कोरोना प्रोटोकॉलसंदर्भात निवडणूक आयोगावर नाराजी व्यक्त केली होती. (bengal election permission for roadshow cancelled says election commission of india)

केवळ कोरोना सुरक्षेसंदर्भात परिपत्र जारी करने आणि बैठका घेणे पुरेसे नाही, असे मुख्य न्यायाधीश टी बी एन राधाकृष्णन यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने तीन जनहित याचिकांवर सुनावणी करताना म्हटले होते.

पंतप्रधान मोदींच्या उद्या बंगालमध्ये होणाऱ्या सर्व सभा रद्द, कोरोनावरील हायलेवल बैठकीत होणार सहभागी

पंतप्रधान मोदींचा बंगाल दौरा रद्द -पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या आपल्या सर्व सभा रद्द केल्या आहेत. ते उद्या बंगालमध्ये निवडणूक प्रचार सभा करण्याऐवजी देशातील कोरोना परिस्थितीवर बैठक घेणार आहेत. ते शुक्रवारी कोरोनासंदर्भातील एका हायलेवल बैठकीत सहभागी होतील, असे त्यांनी स्वतः ट्विट करून सांगितले आहे. मात्र, बंगाल भाजपच्या विनंतीवरून मोदी सायंकाळी 5 वाजता व्हर्च्यूअली सभांना संबोधित करणार आहेत.

बंगालमधील आजचे कोरोना बाधित - पश्चिम बंगालमध्ये आज 11,948 नवे कोरोना बाधित समोर आले आहेत. तर 56 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पश्चिम बंगालमधील हा एक दिवसात आलेला आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा आहे.

Corona Vaccine : कोरोना लस घेतल्यानंतर महिलेच्या अंगावर आले रक्ताचे फोड, पाय कापावा लागण्याची सतावतेय भीती

बंगालमध्ये आता पंतप्रधान मोदींच्या मोठ्या सभा होणार नाहीत - तत्पूर्वी, कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर, बंगालमध्ये आता पंतप्रधान मोदींच्या मोठ्या सभा होणार नाहीत. तसेच मोदी काही छोट्या सभा करतील. या सभांना 500च्या वर लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी नसेल, असा निर्णय भाजपने घेतला होता. याशिवाय, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनीही पंतप्रधान मोदींसह सर्व नेत्यांच्या बंगालमध्ये छोट्याच सभा केल्या जातील, असा निर्णय घेतला होता. 

पश्चिम बंगालमध्ये सर्वांना मोफत लस मिळणार - कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी एक महत्त्वाची घोषणा केली. ५ मेपासून राज्यातील १८ वर्षांवरील पात्र असणाऱ्या सर्वांना कोरोना लस पश्चिम बंगाल सरकारच्या वतीने पूर्णपणे मोफत दिली जाणार आहे, असे ममता दीदींनी जाहीर केले. 

CoronaVirus : शरीरातील ऑक्सीजन स्तर कमी होऊ लागला, तर करा 'हा' उपाय; आरोग्य मंत्रालयानं दिलीय माहिती

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी एकूण आठ टप्प्यांत मतदान होत आहे. यांपैकी सहाव्या टप्प्यातील मतदान आज पार पडले. 43 जागांसाठी हे मतदान झाले.

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१corona virusकोरोना वायरस बातम्याBJPभाजपाTrinamool Congressतृणमूल काँग्रेस