CoronaVirus : शरीरातील ऑक्सीजन स्तर कमी होऊ लागला, तर करा 'हा' उपाय; आरोग्य मंत्रालयानं दिलीय माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2021 05:12 PM2021-04-22T17:12:11+5:302021-04-22T17:15:00+5:30

आरोग्यमंत्रालयाने म्हटले आहे, की Proning (पेटावर झोपणे)च्या माध्यमाने शरीरातील ऑक्सीजन स्तर वाढविला जाऊ शकतो. आरोग्य मंत्रालयाने सांगितल्यानुसार...

Health what to do if oxygen level fall in body here is a proning idea from health ministry | CoronaVirus : शरीरातील ऑक्सीजन स्तर कमी होऊ लागला, तर करा 'हा' उपाय; आरोग्य मंत्रालयानं दिलीय माहिती

CoronaVirus : शरीरातील ऑक्सीजन स्तर कमी होऊ लागला, तर करा 'हा' उपाय; आरोग्य मंत्रालयानं दिलीय माहिती

googlenewsNext

नवी दिल्ली/मुंबई - कोरोना व्हायरसमुळे देशात हेल्थ इमरजन्सीची स्थिती निर्माण झाली आहे. रुग्णांसाठी देशात सर्वत्र ऑक्सीजनचा तुटवडा जाणवत आहे. अशात आरोग्य मंत्रालयाने काही उपाय सुचवले आहेत. या माध्यमाने घरच्या घरीच शरीरातील ऑक्सीजनचा स्तर योग्य केला जाऊ शकतो. (Health what to do if oxygen level fall in body here is a proning idea from health ministry)

आरोग्यमंत्रालयाने म्हटले आहे, की Proning (पेटावर झोपणे)च्या माध्यमाने शरीरातील ऑक्सीजन स्तर वाढविला जाऊ शकतो. आरोग्य मंत्रालयाने सांगितल्यानुसार, मेडिकली Proning ला शरीरात ऑक्सीजनचा स्तर वाढविण्याच्या क्रियेच्या रुपात मान्यता आहे आणि हे होम आयसोलेशनमध्ये राहणाऱ्या कोरोनाबाधितांसाठी अत्यंत फायदेशीर आहे.

कोरोना काळात अचानक पैशांची गरज पडली तर! जाणून घ्या, कुठून होऊ शकते तत्काळ व्यवस्था?

आरोग्य मंत्रालयाने सांगितल्याप्रमाणे, रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होत असेल आणि शरीरातील ऑक्सीजनचा स्तर 94 पेक्षा कमी झाला असेल, तेव्हा Proning ची आवश्यकता भासते. एवढेच नाही, तर वेळ असताच Proning क्रियेच्या माध्यमाने अनेकांचा जीव वाचविला जाऊ शकतो.

आरोग्य मंत्रालयाने म्हटल्याप्रमाणे, Proning साठी रुग्णाला पोटावर झोपायचे आहे आणि एक उशी तोंड अथवा मानेखाली आणि एख अथवा दोन उशा छाती आणि पोटाखाली तसेच 2 उशा पायाखाली ठेवायच्या आहेत. या क्रियेसाठी 4-5 उशांची गरज पडेल आणि या क्रियेदरम्यान रुग्णाला सातत्याने श्वास घेत रहायचे आहे. तसेच Proning क्रिया 30 मिनिटांपेक्षा अधिक वेळ करायची नाही, अशी सूचनाही आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. 

CoronaVirus : कोरोना लशीच्या पहिल्या डोसनंतर रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, तर दुसरा डोस केव्हा घ्याल?

आरोग्य मंत्रालयाने Proning संदर्भात आणखीही काही सूचना दिल्या आहेत. यानुसार जेवणानंतर एक तास ही क्रिया करू नये. जेव्हा ही क्रिया करणे सहज शक्य असेल त्याच वेळी ही क्रिया करावी. गर्भधारणा किंवा हृदयविकाराचा त्रास असल्यास ही क्रिया करू नये, असेही आरोग्य मंत्रालायने म्हटले आहे.



"आणखी अनेक वर्षं कोरोनापासून सुटका नाही, कोवीड-१९चं नवं रूप संकटांचा संकेत!"

 

 

Web Title: Health what to do if oxygen level fall in body here is a proning idea from health ministry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.