CoronaVirus : कोरोना लशीच्या पहिल्या डोसनंतर रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, तर दुसरा डोस केव्हा घ्याल?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2021 03:28 PM2021-04-22T15:28:50+5:302021-04-22T15:41:27+5:30

जर आपल्या पहिल्या डोसला तीन अथवा चार आठवडे झाले असतील तर अर्थात आपल्या पहिल्या डोसला 42 दिवसांपेक्षा अधिक काळ झाला असेल तर, आपल्याला आपला दुसरा डोस लवकरात लवकर मिळायला हवा. (Corona Vaccine)

Corona Virus positive after the first dose of vaccine when to get second dose tedu | CoronaVirus : कोरोना लशीच्या पहिल्या डोसनंतर रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, तर दुसरा डोस केव्हा घ्याल?

CoronaVirus : कोरोना लशीच्या पहिल्या डोसनंतर रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, तर दुसरा डोस केव्हा घ्याल?

Next

नवी दिल्ली/मुंबई - कोरोनाला आळा घालण्यासाठी सरकार देशात 1 मेपासून लसीकरणाचा नवा टप्पा सुरू करत आहे. मात्र, तरीही अनेकांच्या मनात लसीकरणासंदर्भात अनेक प्रश्न आहेत. यात एक प्रश्न सातत्याने विचारला जातो. तो म्हणजे, जर मी लशीचा पहिला डोस घेतला असेल आणि यानंतर दुसरा डोस घेण्याआधीच माझा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला असेल, तर दुसरा डोस केव्हा घ्यावा, अथवा घ्यायचा की नाही? 

यावर उत्तर देताना दिल्लीतील एम्‍समधील प्रोफेसर डॉ. मंजरी त्रिपाठी म्हणतात, की हो, दुसऱ्यांदा लस घ्यायची आहे. ती आपण आठ आठवड्यांच्या आत टोचून घ्या. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडूनही लशीसंदर्भात जारी करण्यात आलेल्या माहितीतही, कोरोना पुन्हा होऊ नये, यासाठी या विरुद्ध पूर्णपणे सुरक्षित व्हायचे आहे. यासाठी आपल्याला दुसरा डोस निश्चितपणे मिळायला हवा. मात्र, इतरांना व्हायरसपासून वाचविण्यासाठी, आपण आजारी असताना अथवा आयसोलेशनच्या काळात लस घेऊ नये. आयसोलेशन काळ पूर्ण झाल्यानंतर आपल्याला लशीचा दुसरा डोस मिळू शकते, असे सांगण्यात आले आहे. 

कोरोना काळात अचानक पैशांची गरज पडली तर! जाणून घ्या, कुठून होऊ शकते तत्काळ व्यवस्था?

जर आपल्या पहिल्या डोसला तीन अथवा चार आठवडे झाले असतील तर अर्थात आपल्या पहिल्या डोसला 42 दिवसांपेक्षा अधिक काळ झाला असेल तर, आपल्याला आपला दुसरा डोस लवकरात लवकर मिळायला हवा. रोग नियंत्रण व प्रतिबंध केंद्र मात्र, या वेळेपेक्षा अधिक वेळ  झाल्यास तिसऱ्या डोसची परवानगी देत नाहीत.

अधिक सविस्तर माहितीसाठी या लिंकला भेट द्या...
यासंदर्भात एम्सचे डायरेक्टर डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटले, अनेक लोकांना वाटते, की कोरोना झाल्यानंतर दुसऱ्या डोसची आवश्यकता नाही. मात्र, मला वाटते, की आपण दुसरा डोसही घ्याला हवा. जेणे करून आपली रोगप्रतिकार शक्ती याहीपेक्षा वाढेल.

"आणखी अनेक वर्षं कोरोनापासून सुटका नाही, कोवीड-१९चं नवं रूप संकटांचा संकेत!"

गुलेरिया यांनी म्हटले आहे, की आपण जेव्हा संक्रमित होता, तेही एक प्रकारचे लसीकरणच आहे. कारण यामुळेही आपल्या शरीरात अँटीबॉडीज तयार होतात. जर पहिल्या डोसनंतर कुणाला कोरोनाची लागण झाली, तर यातही त्याच्या शरीरात अँटीबॉडीज तयार होईल. त्याला सुरक्षितता मिळेल. त्यांना आपला दुसरा डोस 6 आठवडे अथवा तीन महिन्यांनंतर घेता येईल. 

भारतात रशियन व्हॅक्सीन Sputnik V ला मंजुरी; जाणून घ्या, Covishield, Covaxinच्या तुलनेत किती आहे प्रभावी?

Web Title: Corona Virus positive after the first dose of vaccine when to get second dose tedu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.