Bengal BJP mp saumitra khan called actress saayoni ghosh is original sex worker in rally | बंगाल : भाजपा खासदाराची जीभ घसरली; अभिनेत्रीचा सेक्स वर्कर म्हणून केला उल्लेख

बंगाल : भाजपा खासदाराची जीभ घसरली; अभिनेत्रीचा सेक्स वर्कर म्हणून केला उल्लेख

ठळक मुद्देसायोनी घोषनं शिवलिंग आणि देवी सरस्वतीबद्दल केली होती वादग्रस्त टीकाममता बॅनर्जींना उत्तर देण्याची हीच वेळ, खान यांचं वक्तव्य

अभिनेत्री सायोनी घोषनं शिवलिंग आणि देवी सरस्वती यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर तिच्या विरोधातील सूर उमटू लागला होता. दरम्यान भारतीय जनता पक्षाचे खासदार सौमित्र खान यांची जीभ घसरली असून त्यांनी सायोनी घोष हिचा उल्लेख सेक्स वर्कर असा केला. पूर्व बर्दवान जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या एका सभेदरम्या त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. तसंच ममता बॅनर्जी यांच्या सायकल देण्याच्या दाव्याविरोधात सौमित्र खान यांनी पश्चिम बंगालच्या प्रत्येक घरात एक स्कुटी आणि नोकरी देण्याचं आश्वासनही देऊन टाकलं. 

या सभेदरम्यान सौमित्र खान यांनी सायोनी घोष हिच्यावर टीका केली. "सायोनी घोष हिच्यासारखे काही कलाकार शिवलिंग आणि देवी सरस्वतीबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करतात. मी असं मानतो की देवी सरस्वती आणि शिवलिंगाचा अवमान करणारे लोकच खऱ्या अर्थानं सेक्स वर्कर्स आहेत," असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं. "अभिनेत्री सायोनी घोषनं देवी सरस्वतीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं. पण मी सांगतो सायनी घोष खरी सेक्स वर्कर आहे. हे वक्तव्य करण्यासाठी माझ्यावर केसही करू शकता. ममता बॅनर्जी यांना उत्तर देण्याची वेळ आली आहे. अन्यथा एकही मंदिर उरणार नाही," असंही ते म्हणाले. 

यादरम्यान सौमित्र खान यांनी बेरोजगारीसह अन्य मुद्द्यांवरून पश्चिम बंगालच्यामुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांच्यावर जोरदार टीका केली. "ममता बॅनर्जी सायकल देणार आहेत. परंतु आम्ही जर सत्तेत आलो तर प्रत्येक घरात स्कुटी आणि प्रत्येक घरात एक नोकरी देण्याची व्यवस्था करू," असं ते म्हणाले.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Bengal BJP mp saumitra khan called actress saayoni ghosh is original sex worker in rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.