शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

बेळगाव हे महाराष्ट्रात कधीच विलीन होणार नाही; ते कर्नाटकचाच भाग- मुख्यमंत्री सिद्धरामय्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2025 14:42 IST

कोणी गुंडगिरी केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल

बंगळुरू: बेळगाव हा कर्नाटकचा अविभाज्य भाग आहे. ते कधीच महाराष्ट्रात विलीन होणार नाही, असे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शनिवारी सांगितले. कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादावर महाजन समितीने दिलेल्या अहवालातील निष्कर्ष हे अंतिम आहेत. त्यामुळे बेळगाव प्रश्नावर आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही, असेही त्यांनी सांगितले. सिद्धरामय्या म्हणाले की, बेळगावच्या प्रश्नावर महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला असला तरी आम्ही बेळगाव कोणालाही देणार नाही, ते कर्नाटकचे अविभाज्य अंग आहे.

‘महाराष्ट्र एकीकरण समितीचे लोक कन्नडिगच’

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले की, पूर्वी महाराष्ट्र एकीकरण समितीचे पाच आमदार निवडून येत असत. परंतु, आता त्यांची संख्या शून्यावर आली आहे. या समितीचे लोकही कन्नडिगच आहेत. मात्र, कोणी गुंडगिरी केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. 

केरळ गरिबीमुक्त, मुख्यमंत्र्यांची घोषणा

तिरुवनंतपूरम : केरळ गरिबीमुक्त राज्य झाल्याची घोषणा मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी शनिवारी विधानसभेत केले. केरळ राज्याच्या स्थापना दिनानिमित्त बोलावण्यात आलेल्या विशेष  अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. मात्र, काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त लोकशाही आघाडीने मुख्यमंत्री विजयन करत असलेला दावा फसवा असल्याचा आरोप केला आहे. डावी लोकशाही आघाडी सरकार फसणूक करीत असल्याचा आरोप करीत विरोधकांनी विशेष अधिवेशनातून सभात्याग केला. केरळ सरकारच्या प्रयत्नातून ६२ लाख कुटुंबांना कल्याणकारी पेन्शन, ४३ लाख कुटुंबांना मोफत आरोग्य विमा वाटप करण्यात आले. त्यामुळे राज्याला दारिद्र्यमुक्त करता आल्याचे विजयन यांनी स्पष्ट केले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Belgaum will never merge with Maharashtra: Karnataka CM Siddaramaiah

Web Summary : Karnataka CM Siddaramaiah declared Belgaum an integral part of Karnataka, dismissing Maharashtra's claims. Mahajan report final, no compromise. Kerala declared poverty-free by CM Vijayan, a claim disputed by the opposition who walked out of assembly.
टॅग्स :belgaonबेळगाव