बियास : आणखी दोन मृतदेह सापडले

By Admin | Updated: June 13, 2014 03:45 IST2014-06-13T03:45:28+5:302014-06-13T03:45:28+5:30

येथील बियास नदीच्या अचानक वाढलेल्या वेगवान प्रवाहात वाहून गेलेल्या अभियांत्रिकी मुलांपैकी अजून दोन मुलांचे मृतदेह शोधकर्त्यांना सापडले आहेत

Beas: Two more bodies were found | बियास : आणखी दोन मृतदेह सापडले

बियास : आणखी दोन मृतदेह सापडले

मंडी : येथील बियास नदीच्या अचानक वाढलेल्या वेगवान प्रवाहात वाहून गेलेल्या अभियांत्रिकी मुलांपैकी अजून दोन मुलांचे मृतदेह शोधकर्त्यांना सापडले आहेत. हे मृतदेह दगडांमध्ये अडकून पडल्याने ते बाहेर काढताना या शोधकर्त्यांना बराच खटाटोप करावा लागला. या मुलांचा शोध घेण्याचा हा चौथा दिवस असून अद्याप १७ मुलांचा शोध घेणे बाकी आहे.
या विद्यार्थ्यांची ओळख टी. उमेंद्र आणि गोमुर अरविंदकुमार अशी पटली आहे. या दुर्घटनेत सापडलेल्या विद्यार्थ्यांपैकी आतापर्यंत सात जणांचे मृतदेह काढण्यात यश आले आहे.
राष्ट्रीय आपत्ती प्रतिक्रिया दलाच्या नेतृत्वात विविध संघटनांचे सुमारे ५५० हून अधिक शोधकर्ता या कामात गुंतले असून डोंगरावरील बर्फ वितळू लागल्यानेही नदीच्या जलप्रवाहाच्या पातळीत वाढ झाली आहे. (वृत्तसंस्था)





 

Web Title: Beas: Two more bodies were found