शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण
2
सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला?
3
प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे
4
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
5
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
6
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
7
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
8
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
9
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
10
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
11
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
12
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
13
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
15
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
16
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
17
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
18
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
19
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
20
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

बीसीसीआय सुनावणी

By admin | Updated: December 18, 2014 00:40 IST

व्यावसायिक हित जोपासणाऱ्यांत

व्यावसायिक हित जोपासणाऱ्यांत
गावसकर, शास्त्री, श्रीकांत, गांगुलीचा समावेश
बीसीसीआय : प्रशासक, संचालकांची यादी सुप्रीम कोर्टात सादर
नवीो दिल्ली : बीसीसीआयमध्ये व्यावसायिक हित जोपासणाऱ्यांमध्ये माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर, टीम इंडियाचे संचालक रवी शास्त्री, निवड समितीचे माजी अध्यक्ष कृष्णम्माचारी श्रीकांत यांच्यासह माजी कर्णधार सौरभ गांगुली आणि वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद यांचा समावेश आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर बीसीसीआयने बुधवारी काही प्रशासक आणि संचालकांची यादी सादर केली.
अनेक आठवडे चाललेली मॅरेथॉन सुनावणी संपल्यानंतर कोर्टाने बीसीसीआयमध्ये पुनरागमनाचे वेध लागलेले एन. श्रीनिवासन यांना दुसऱ्यांदा अध्यक्षपदाची निवडणूक लढविण्यास तसेच चेन्नई सुपरकिंग्सच्या खरेदीवरून उद्भवलेल्या दुटप्पी भूमिकेबाबतचा निर्णय राखून ठेवला. विशेष खंडपीठाने श्रीनवासन यांच्या बोर्डाचे प्रमुख आणि सीएसकेचे मालक या दुटप्पी भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
आयपीएलच्या सहाव्या पर्वातील स्पॉट फिक्सिंग आणि सट्टेबाजीप्रकरणी सुनावणी करणारे न्या. टी. एस. ठाकूर आणि न्या. एफएमआय कलिफुल्ला यांच्या खंडपीठाच्या निर्देशानुसार आयपीएल तसेच चॅम्पियन्स लीगमध्ये व्यावसायिक हितसंबंध असलेल्या संचालक आणि प्रशासकांची यादी आज बीसीसीआयने सादर केली. या यादीत उपरोक्त नावांसह लालचंद राजपूत यांचाही समावेश आहे.
यादी वाचल्यानंतर न्यायालयाने ताशेरे ओढताना म्हटले की श्रीकांत राष्ट्रीय निवडकर्ते आहेत आणि हैदराबाद सनराईजर्सचे मेंटॉर देखील. हे कसे काय शक्य आहे? विशेष असे की भ्रष्टाचारप्रकरणी अस्थायी निलंबनानंतर श्रीनिवासन यांच्याऐवजी श्रीकांत हेच आयपीएल २०१४ चे संचालन करीत होते.
बीसीसीआयने २००८ साली आपल्या संविधानातील ६.२.४ या नियमांत दुरुस्ती केली. त्यानुसार बीसीसीआयचे अधिकारी आणि प्रशासकांना आयपीएल तसेच चॅम्पियन्स लीगमधील संघ खरेदी व प्रायोजकत्वाचे अधिकार बहाल करण्यात आले होते. याच वादग्रस्त संशोधनामुळे क्रिकेटमध्ये पैशाचा ओघ वाढलाच शिवाय अफरातफरीला पळवाटा फुटू लागल्याचे अनेक क्रिकेट प्रशासकांचे मत आहे.(वृत्तसंस्था)
................................................................