शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

बावनथडी

By admin | Updated: December 18, 2014 00:40 IST

प्रकल्पाने हिरावला आमचा रोजगार

प्रकल्पाने हिरावला आमचा रोजगार
बावनथडी प्रकल्पग्रस्तांची व्यथा : ५ महिलांचे आमरण तर १५ नागरिकांचे साखळी उपोषण
गणेश खवसे ० नागपूर
गाव प्रकल्पात गेले अन् सुखी संसाराला जणू दृष्टच लागली. प्रकल्पासाठी शेती अधिग्रहित केली, घरांवर बुलडोझर चालले. नवीन ठिकाणी गावांचे पुनर्वसन केले. परंतु, तेथेही समस्यांनी प्रकल्पग्रस्तांना घेरले. रोजगार हिरावला आणि उपाशी राहण्याची वेळ आली. या समस्यांना वाचा फुटावी, यासाठी प्रकल्पग्रस्तांपैकी ५ महिलांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली. त्यांच्यासोबत १५ प्रकल्पग्रस्त साखळी उपोषण करीत आहे. मात्र त्यांच्या समस्यांची दखल घ्यायला तेथे कुणीच फिरकले नाही, हे वास्तव आहे.
महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यातील आठ गावांसाठी बावनथडी प्रकल्प जणू डोकेदुखीच ठरला. १९७५ च्या दरसूचीनुसार या प्रकल्पाची किंमत २३.४७ कोटी एवढी होती. तिसऱ्या दरसूचीनुसार तो ५६१.३६ कोटी तर २००८-०९ च्या चतुर्थ दरसूचीनुसार हा प्रकल्प १४०७.१९ कोटी रुपयांवर गेला. या प्रकल्पाने नागपूर जिल्ह्यातील पुसदा, चिकनापूर, पिंडकेपार, मुरझड व सीतेपार (टोला) ही पाच गावे तर भंडारा जिल्ह्यातील सीतेकसा, सुसुरडोह व कमकासूर ही तीन गावे बाधित झाली. या आठ गावातील एकूण ७५६ कुटुंबापैकी ७२० कुटुंबाचे स्थलांतरण पुनर्वसित ठिकाणी झाले. मात्र तेथे नागरी सुविधांचा अभाव आहे.
पुनर्वसन ठिकाणी रोजगाराची साधने नाही. अधिग्रहित करण्यात आलेल्या जमिनीचा अत्यल्प मोबदला दिला. याविरोधात जनसमस्या अन्यायग्रस्त समितीच्या माध्यमातून सारजा उईके, जानू शेंदरे, रत्ता खंडाते, भिवरी उईके, जयवंती कोरचे, रेखा उईके यांनी संगीता खुरपे यांच्या नेतृत्वात आमरण उपोषण सुरू केले आहे. तर मायराम मसरकोल्हे, सुखराम कोरचे, मुखचरण उईके, भाऊलाल उईके, सुखराम उईके, जयराम गोंडगे, अरविंद धुर्वे, फुलचंद खुरपे यांच्यासह इतरांनी साखळी उपोषण सुरू केले आहे. विशेष म्हणजे, २०१३ च्या हिवाळी अधिवेशनात सारजा उईके आणि संगीता खुरपे यांनी आमरण उपोषण केले होते. परंतु त्यांच्या मागण्यांची अद्याप शासनाने दखल घेतलेली नाही.