शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

पार्किंगमधून हटणार बँक

By admin | Updated: February 13, 2015 00:38 IST

- सूर्यनगरच्या तीनमजली इमारतीत अनधिकृत बांधकामनागपूर : कळमना मार्केट रोड सूर्यनगर येथील एका तीन मजली इमारतीच्या पार्किंगमध्ये अनधिकृत बांधकाम करून तेथे राष्ट्रीयकृत बँक सुरू आहे. संबंधित बँक त्वरित हटविण्याचे निर्देश नासुप्रने दिले आहेत.सूर्यनगर येथे खसरा क्र.१४-१५ वर प्लॉट नंबर १९१ वरील इमारत मालक डोगरमल शर्मा यांनी दोन ...


- सूर्यनगरच्या तीनमजली इमारतीत अनधिकृत बांधकाम
नागपूर : कळमना मार्केट रोड सूर्यनगर येथील एका तीन मजली इमारतीच्या पार्किंगमध्ये अनधिकृत बांधकाम करून तेथे राष्ट्रीयकृत बँक सुरू आहे. संबंधित बँक त्वरित हटविण्याचे निर्देश नासुप्रने दिले आहेत.
सूर्यनगर येथे खसरा क्र.१४-१५ वर प्लॉट नंबर १९१ वरील इमारत मालक डोगरमल शर्मा यांनी दोन मजली बांधकामासाठी परवानगी घेतली. यानंतर मंजूर नकाशाशिवाय तिसऱ्या माळ्यावर अतिरिक्त बांधकाम केले. याशिवाय तळमजल्यावर पार्किंगच्या जागेत अनधिकृत बांधकाम करून स्टेट बँक ऑफ बीकानेर ॲण्ड जयपूरला किरायाने दिले. तिसऱ्या माळ्यावर कमर्शिअल उपयोग केला जात होता. या अनधिकृत बांधकामासाठी २७ एप्रिल १९९६ रोजी इमारत मालकाला नासुप्रने नोटीस बजावली होती. त्यानंतर हे प्रकरण बरीच वर्षे न्यायालयात प्रलंबित राहिले. नासुप्र अधिकाऱ्यांनुसार न्यायालयाने इमारत मालकाची अपील रद्द केली. यानंतर नासुप्रचे अभियंता अविनाश भोगले, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक नितीन रहाटे, पथक प्रमुख वसंत कन्हेरे व चमूने गुरुवारी दुपारी संबंधित इमारतीचे निरीक्षण केले व पार्किंगच्या जागेवर सुरू असलेली बँक त्वरित हलविण्याचे निर्देश दिले. नासुप्रने इमारतीच्या तिसऱ्या माळ्यावरील अनधिकृत बांधकाम तोडण्याची तयारी केली आहे.