शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

बंगलोर- एर्नाकुलम इंटरसिटी एक्स्प्रेस रुळावरून घसरली

By admin | Updated: February 13, 2015 23:10 IST

९ प्रवासी ठार, १६ गंभीर जखमी

९ प्रवासी ठार, १६ गंभीर जखमी
अनेकल(कर्नाटक)- कर्नाटक- तामिळनाडू सीमेवर अनेकल येथे शुक्रवारी सकाळी ७.३० वाजता रुळावर दरड कोसळल्यामुळे बंगलोर- एर्नाकुलम इंटर सिटी एक्स्प्रेसचे नऊ डबे घसरून झालेल्या भीषण अपघातात ९ प्रवासी ठार तर १६ जखमी झाले.
सकाळी ७.३० वाजता बेंगळुरूपासून ४५ किमी अंतरावरील अनेकल आणि होसुल दरम्यान रेल्वेमार्गावर हा अपघात झाला. बंगलोर-एर्नाकुलम इंटरसिटी एक्स्प्रेस सकाळी ६ वाजून १५ मिनिटांनी बेंगळुरूवरून रवाना झाली होती.
घटनास्थळी हजर विभागीय रेल्वे व्यवस्थापक अनिलकुमार अग्रवाल यांनी पत्रकारांना या अपघाताची माहिती देताना सांगितले की, मदत कार्य पूर्ण होईपर्यंत मृतांचा आकडा नऊवर पोहोचला होता. मृतांमध्ये पाच पुरुष, तीन महिला आणि नऊ वर्षाच्या एका बालकाचा समावेश आहे.
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी घटनेनंतर लगेच केलेल्या टिष्ट्वटमध्ये रुळावर एक मोठा दगड पडला होता. इंटरसिटी एक्स्प्रेस त्यावर धडकल्याने हा अपघात घडल्याचे म्हटले आहे.
आपण एका मोठ्या दगडाचा आवाज ऐकल्याचे गाडीचालकाने अधिकाऱ्यांना सांगितले होते. परंतु असा कुठलाही दगड मिळालेला नाही,असे अग्रवाल यांनी स्पष्ट केले.
अपघातात जखमी १६ प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती कर्नाटकचे पोलीस महासंचालक लालरोखुमा पचाऊ यांनी दिली. किरकोळ जखमींना प्राथमिक उपचारानंतर सुटी देण्यात आली आहे.
रेल्वे, पोलीस, अग्निशामक विभाग आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकातर्फे संयुक्तपणे बचाव कार्य सुरूअसून कर्नाटक आणि तामिळनाडूच्या डॉक्टरांचे पथकही घटनास्थळी पोहोचले आहे. केंद्रीय विधी मंत्री डी.व्ही. सदानंद गौडा तातडीने अपघातस्थळी पोहचले होते. कर्नाटकचे आरोग्य मंत्री यू.टी. खादर यांच्या सांगण्यानुसार या अपघातात ५० प्रवासी जखमी झाले असल्याची माहिती त्यांना प्रशासनाकडून मिळाली आहे.


रेल्वेमंत्री अपघातस्थळी,चौकशीचे आदेश
दरम्यान अपघातस्थळी पोहोचलेले रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांनी या अपघाताची जबाबदारी निश्चित करण्याचे तसेच भविष्यात अशाप्रकारच्या अपघातांवर आळा घालण्याच्या दृष्टीने सुरक्षात्मक उपाय करण्याचे निर्देश दिले आहेत. या घटनेबद्दल दुखवटा व्यक्त करताना त्यांनी अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना दोन लाख रुपये, गंभीर जखमींना ५०,००० रुपये तर किरकोळ जखमींना २०,००० रुपये आर्थिक मदत जाहीर केली.

पंतप्रधानांचा दुखवटा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भीषण रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांबद्दल दुखवटा व्यक्त करताना त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले आहे. (वृत्तसंस्था)