बॅडमिंटन भारत

By Admin | Updated: December 18, 2014 22:39 IST2014-12-18T22:39:31+5:302014-12-18T22:39:31+5:30

श्रीकांतची उपांत्य फेरीकडे कूच

Badminton India | बॅडमिंटन भारत

बॅडमिंटन भारत

रीकांतची उपांत्य फेरीकडे कूच
सुपर सिरिज बॅडमिंटन : दुसरा सामनाही जिंकला
दुबई : भारताचा युवा प्रतिभावान खेळाडू के. श्रीकांत याने विश्व सुपर सिरिज बॅडमिंटनच्या अंतिम लीगमध्ये गुरुवारी सलग दुसरा विजय साजरा केला. या विजयामुळे त्याने सेमीफायनलकडे कूच केली आहे.
विश्वक्रमवारीत आठव्या स्थानावर असलेल्या श्रीकांतने ब गटाच्या लढतीत इंडोनेशियाचा टॉमी सुगिआंतो याचा केवळ ३८ मिनिटांत सरळ गेममध्ये २१-१८, २१-१३ अशा फरकाने फडशा पाडला. पहिल्यांदा स्पर्धेत उतरलेल्या श्रीकांतने बुधवारच्या पहिल्या सामन्यात एका तासात जपानचा केंटो मोमोतो याला पहिला गेम गमविल्यानंतरही जोरदार मुसंडी मारुन १५-२१, २१-१६, २१-१० अशा फरकाने विजय साजरा केला होता. (वृत्तसंस्था)

Web Title: Badminton India