बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 18:38 IST2025-06-19T18:37:23+5:302025-06-19T18:38:18+5:30

लग्नानंतर अवघ्या दीड महिन्यांतच तरुणाचा मृत्यू झाला. यानंतर कुटुंबीयांनी गंभीर आरोप केले आहेत.

badaun wife elopes with lover husband dies of shock | बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न

फोटो - nbt

उत्तर प्रदेशातील बदायूंमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. लग्नानंतर अवघ्या दीड महिन्यांतच तरुणाचा मृत्यू झाला. यानंतर कुटुंबीयांनी गंभीर आरोप केले आहेत. तरुणाचं लग्न झाल्यानंतर १८ व्या दिवशी त्याच्या पत्नीने कुटुंबातील सदस्यांना नशा आणणारा पदार्थ खाऊ खातला आणि घरातून पळ काढला. घरात ठेवलेली रोख रक्कम आणि दागिने घेऊन ती बॉयफ्रेंडसोबत पसार झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

या प्रकरणाची पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती पण पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. लग्नाच्या काही दिवसांनंतर पत्नी पळून गेल्यामुळे नैराश्यात असलेल्या पतीने गेल्या ७ दिवसांपासून खाणं-पिणं बंद केलं होतं. याच धक्क्याने त्याचा मृत्यू झाला. पोलिसांचं म्हणणं आहे की, या संदर्भात पोलीस ठाण्यात कोणतीही लेखी तक्रार देण्यात आली नव्हती, आज हे प्रकरण उघडकीस आलं आहे आणि तपास केला जाईल.

२२ एप्रिल २०२५ रोजी अलापूर पोलीस स्टेशन परिसरातील हिमांशी उर्फ ​​मानसी नावाच्या मुलीशी रमेशचं लग्न झालं होतं. लग्नानंतर रमेशची पत्नी तासनतास फोनवर कोणाशी तरी बोलत असे. रमेशने विचारले असता ती तिच्या पालकांशी फोनवर बोलत असल्याचं सांगायची लग्नानंतर रमेश कामासाठी पंजाबला गेला. याचा फायदा घेत हिमांशी बॉयफ्रेंडसह पळून गेली.

पती रमेशला ही बाब कळताच तो दातागंज येथील त्याच्या घरी पोहोचला. त्यानंतर त्याने कोतवाली पोलिसांकडे तक्रार दिली आणि पत्नीवर आरोप केले आणि कारवाईची विनंती केली. परंतु पोलिसांनी या प्रकरणाकडे दुर्लक्ष केलं. रमेशच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, रमेशला यामुळे धक्का बसला होता आणि गेल्या एका आठवड्यापासून त्याने खाणे-पिणं बंद केलं होतं. तो रात्रभर झोपायचा नाही. त्याला याचा खूप मानसिक त्रास झाला होता. 
 

Web Title: badaun wife elopes with lover husband dies of shock