शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
3
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
4
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
5
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
6
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
7
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
8
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
9
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
10
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
11
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

तारीख ठरली ! अयोध्या निकाल १७ पूर्वी; सोशल मीडियावर निर्बंध

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2019 7:11 AM

उत्तर प्रदेश : देव-देवतांसंबधी बदनामीकारक पोस्ट करण्यास प्रतिबंध

अयोध्या : देवदेवतांसंबधी कोणताही बदनामीकारक मजकूर समाजमाध्यमांवर झळकविण्यास प्रतिबंध करणारा आदेश उत्तर प्रदेश सरकारने जारी केला असून, तो २८ डिसेंबरपर्यंत लागू राहील. साऱ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या राम जन्मभूमी खटल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालय १७ नोव्हेंबरच्या आधी देण्याची शक्यता आहे. त्याच्या आधी किंवा नंतर कोणताही तणाव पसरू नये म्हणून उत्तर प्रदेश सरकारने हे पाऊल उचलले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप, टिष्ट्वटर, फेसबुक, टेलिग्राम, इन्स्टाग्राम अशा समाजमाध्यमांवर अशा प्रकारचा मजकूर कोणीही झळकविल्यास त्यावर तात्काळ कारवाई करण्यात येईल. तसेच अशा वादग्रस्त मजकुराबाबत चर्चा घडविण्यास दूरचित्रवाहिन्या व वृत्तवाहिन्यांना दोन महिन्यांसाठी बंदी घालण्यात आली आहे. अयोध्या जिल्ह्यामध्ये २८ डिसेंबरपर्यंत सरकारच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणत्याही देवतेच्या मूर्तीची स्थापना करता येणार नाही. या कालावधीत छठपूजा, कार्तिक पौर्णिमा, पंचकोशी परिक्रमा, चौधरी चरणसिंग यांची जयंती, गुरुनानक जयंती, गुरुतेगबहाद्दूर शहीद दिवस, इद-उल-मिलाद, नाताळ असे अनेक महत्त्वाचे दिवस व सण येत आहेत.त्यावेळी विपरीत घटना घडून सामाजिक सलोखा बिघडू नये म्हणून ही दक्षता घेण्यात आल्याचे या आदेशात म्हटले आहे. अयोध्येचे जिल्हाधिकारी अनुजकुमार झा यांनी हा आदेश सर्वप्रथम १० आॅक्टोबर रोजी जारी केला होता. त्यात नंतर ३० गोष्टींचे सविस्तर स्पष्टीकरण देऊन सुधारित चार पानी आदेश ३१ आॅक्टोबर रोजी काढण्यात आला. मोर्चे, सभांच्या आयोजनासही मनाईच्अयोध्या जिल्ह्यातील सरकारी अधिकारी वगळता अन्य कुणाही नागरिकाला रीतसर परवानगी घेतली नसल्यास दोन महिन्यांसाठी परवानाधारक शस्त्रेही जवळ बाळगता येणार नाहीत.च्अ‍ॅसिडसारखी ज्वलनशील रसायने व पदार्थ अवैधरीत्या बाळगणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल.च्अयोध्येत कोणत्याही सभा, मोर्चे, सांस्कृतिक कार्यक्रमांचे २८ डिसेंबरच्या कालावधीपर्यंत आयोजन करण्यास प्रशासनाने बंदी घातली आहे.

टॅग्स :Ayodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिरSupreme Courtसर्वोच्च न्यायालय