शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
2
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
3
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
4
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
5
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
6
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
7
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
8
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
9
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
10
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
11
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
12
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
13
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
14
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
15
‘स्लीपर वंदे भारत’ जगात स्वस्त! चीन, अमेरिकेत हायस्पीड ट्रेनचे तिकीट किती? आकडे अवाक् करतील
16
नव्या आर्थिक वर्षात टाटा मोठा धमाका करणार! लवकरच ६ नव्या 'ढासू' कार बाजारात आणणार; बघा संपूर्ण प्लॅन
17
हॉटेलची रूम दिसते चकाचक, पण टॉयलेट सीटपेक्षा घाणेरड्या असतात 'या' गोष्टी; वापरताना सावधान
18
महिलांना दरमहा ३००० रुपये, मोफत बस प्रवास अन्...! सुवेंदू सरकार ॲक्शन मोडवर, १ जूनपासून खात्यात जमा होणार पैसे
19
"रस्त्यावर नमाज पठण चालणार नाही, प्रेमाने सांगून ऐकलं नाही तर..."; मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा इशारा 
20
IPL 2026 सुरू असताना धोनी अचानक NSG कॅम्पमध्ये; कमांडोंसोबत केला नेमबाजीचा सराव (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद महापालिकेत १४ कोटींचा घोटाळा !

By admin | Updated: August 22, 2015 00:43 IST

बोगस लाभार्थी : अण्णा भाऊ साठे महामंडळाची पुनरावृत्तीमुजीब देवणीकरऔरंगाबाद : अण्णा भाऊ साठे महामंडळातील कोट्यवधी रुपयांचा घोटाळा राज्यभर गाजत असताना येथील महापालिकेच्या प्रकल्प विभागातही तब्बल १४ कोटी रुपयांचा महाघोटाळा झाल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे. बेरोजगार तरुणांना मिळणारे प्रत्येकी दोन लाख रुपये बोगस लाभार्थी दाखवून उचलण्यात आले आहेत.१९९७ मध्ये ...


बोगस लाभार्थी : अण्णा भाऊ साठे महामंडळाची पुनरावृत्ती

मुजीब देवणीकर
औरंगाबाद : अण्णा भाऊ साठे महामंडळातील कोट्यवधी रुपयांचा घोटाळा राज्यभर गाजत असताना येथील महापालिकेच्या प्रकल्प विभागातही तब्बल १४ कोटी रुपयांचा महाघोटाळा झाल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे. बेरोजगार तरुणांना मिळणारे प्रत्येकी दोन लाख रुपये बोगस लाभार्थी दाखवून उचलण्यात आले आहेत.
१९९७ मध्ये केंद्र शासनाने सुवर्ण जयंती रोजगार योजना सुरू केली होती. त्यात केंद्राकडून ७० टक्के निधी, राज्य शासनाकडून २५ तर लाभार्थ्याकडून ५ टक्के त्याचा हिस्सा धरुन २ लाख रुपये देण्यात येत होते. योजनेतील लाभार्थी दारिद्र्य रेषेखालील बेरोजगार असावा, अशी अट होती. मागील पाच वर्षांमध्ये महापालिकेला केंद्र आणि राज्य शासनाकडून तब्बल १४ कोटींचे अनुदान प्राप्त झाले. त्यावर दलालांनीच डल्ला मारत बोगस लाभार्थी दाखविल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
२०१४ मध्ये शासनाने सुवर्ण जयंती योजनेचे नाव बदलून राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान असे नामकरण केले. यंदा महापालिकेला २ कोटी ५७ लाख रुपयांचा भरघोस निधीही मिळाला. मात्र त्यासाठी लाभार्थी न येता दुसरीच मंडळी सरसावली. महापालिकेच्या प्रकल्प विभागात बोगस फाईली मंजूर करून घेण्यासाठी सकाळी ८ वाजेपासून काही मंडळी सरसावलेली असतात. महापालिकेतील सर्वच अधिकारी व कर्मचार्‍यांना ही बाब माहीत असली तरी फक्त राजकीय भीतीपोटी प्रत्येक जण शांत बसले आहेत.
--------------------
पारदर्शकतेला बगल
दरवर्षी योजनेत ३०० पेक्षा अधिक बेरोजगारांना लाभ दिल्याचे दाखविण्यात येते. लाभार्थींची यादी मनपाने वेबसाईटवर टाकलेली नाही. महापालिकेने दहा वर्षांपूर्वी दारिद्र्य रेषेखालील नागरिकांचे सर्वेक्षण केले होते. या यादीत अनेक श्रीमंत मंडळींचाही समावेश करण्यात आला होता. यापूर्वी बोगस यादीचा वाद थेट मंत्रालयापर्यंत गेला होता. दलाल मंडळी दारिद्र्य रेषेखालील नागरिकांचे बोगस प्रमाणपत्रही स्वत:हून तयार करतात.
----------------
असा आला निधी
२००९-१०१ कोटी ४४ लाख
२०१०-११२ कोटी ६ लाख
२०११-१२१ कोटी ५७ लाख
२०१२-१३३ कोटी २१ लाख
२०१३-१४२ कोटी ६० लाख
२०१४-१५निधी आला नाही
२०१५-१६२ कोटी ५७ लाख