दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 10:41 IST2025-08-20T09:36:30+5:302025-08-20T10:41:06+5:30
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याने खळबळ उडाली आहे.

दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
Delhi CM Rekha Gupta: दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर आज त्यांच्या सिव्हिल लाईन्स या सरकारी निवासस्थानी साप्ताहिक जनसुनावणी दरम्यान हल्ला करण्यात आला. जनसुनावणीदरम्यान एका व्यक्तीने त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण तिथे उभ्या असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला पकडले. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे आणि हल्ल्यामागील कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. दिल्ली भाजप अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी या घटनेचा निषेध केला.
बुधवारी सकाळी साडेआठ वाजता दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता सीएम सिव्हिल लाईन्स येथील निवासस्थानी जनसुनावणी घेत होत्या. त्यादरम्यान गर्दीतून एका ३५ वर्षीय व्यक्तीने उभे राहून मुख्यमंत्र्यांना एक कागद दिला. मुख्यमंत्र्यांना काही समजण्यापूर्वीच त्या व्यक्तीने त्यांना कानाखाली मारली. त्या व्यक्तीने मुख्यमंत्र्याचे केस ओढले आणि त्यांना चापट मारली. गुप्ता जखमी झाल्या नसल्या तरी, या घटनेने त्यांना धक्का बसला आहे. दरम्यान, डॉक्टरांचे एक पथकही गुप्ता यांच्या निवासस्थानी पोहोचले आहे. घटनेनंतर लगेचच जवळ उभ्या असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला पकडले आणि पोलिसांकडे दिले. ती व्यक्ती कोण हीता आणि त्याने कोणत्या उद्देशाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला हे शोधले जात आहे.
पोलिसांनी काय सांगितले?
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर मुख्यमंत्री निवासस्थानी जनसुनावणी दरम्यान झालेल्या हल्ल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करून सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात नेण्यात आल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली.
One person apprehended and taken to Civil Lines Police Station in connection with attack on Delhi CM Rekha Gupta during Jan Sunvai at CM Residence: Delhi Police https://t.co/V3SAreaKgo
— ANI (@ANI) August 20, 2025
दरम्यान, २० फेब्रुवारी २०२५ रोजी रेखा गुप्ता दिल्लीच्या मुख्यमंत्री झाल्या. दिल्ली विधानसभा निवडणुकीत त्यांनी आपच्या वंदना कुमारी यांचा २९,५९५ मतांनी पराभव केला. रेखा गुप्ता बऱ्याच काळापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहेत. मुख्यमंत्री होण्यापूर्वी त्या दिल्ली भाजपच्या सरचिटणीस आणि भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा देखील राहिल्या आहेत.