शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

शासनाकडून व्यापा-यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न

By admin | Updated: July 31, 2015 22:25 IST

पुणे : राज्यातील स्थानिक संस्था कर ( एलबीटी ) रद्द करण्याचे आश्वासन भारतीय जनता पक्षाने व्यापा-यांना दिले होते. मात्र, आता अधिसूचना काढून 50 कोटींपेक्षा अधिक वार्षीक उलाढाल असलेल्या व्यापा-यांना हा कर कायम ठेवला आहे. त्यामुळे अशा प्रकारे अर्धवट कर रद्द करून शासनाकडून ब्रिटीशांची फोडा आणि राज्य करा ही रणणीती वापरली जात असल्याची टिका पुणे सराफ असोसिएशनचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी केली आहे. मोठया व्यापा-यांना शासनाकडून आकारल्या जाणा-या करांचे दरही अधिक आहेत. असे असतानाच शासनाकडून लहान व्यापा-यांना सूट देण्याच्या नावाखाली त्यांच्यावर आणखी एक कर लादून व्यापारी संघटनांमध्ये फूट पाडण्याचा घाट घातला आहे. निवडणूकीपूर्वी भाजपने एलबीटी पूर्णपणे रद्द करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, तो शब्द पाळला गेला नाही. तसेच लहान व्यापा-यांना सूट देण्याच्या नावाख

पुणे : राज्यातील स्थानिक संस्था कर ( एलबीटी ) रद्द करण्याचे आश्वासन भारतीय जनता पक्षाने व्यापा-यांना दिले होते. मात्र, आता अधिसूचना काढून 50 कोटींपेक्षा अधिक वार्षीक उलाढाल असलेल्या व्यापा-यांना हा कर कायम ठेवला आहे. त्यामुळे अशा प्रकारे अर्धवट कर रद्द करून शासनाकडून ब्रिटीशांची फोडा आणि राज्य करा ही रणणीती वापरली जात असल्याची टिका पुणे सराफ असोसिएशनचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी केली आहे. मोठया व्यापा-यांना शासनाकडून आकारल्या जाणा-या करांचे दरही अधिक आहेत. असे असतानाच शासनाकडून लहान व्यापा-यांना सूट देण्याच्या नावाखाली त्यांच्यावर आणखी एक कर लादून व्यापारी संघटनांमध्ये फूट पाडण्याचा घाट घातला आहे. निवडणूकीपूर्वी भाजपने एलबीटी पूर्णपणे रद्द करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, तो शब्द पाळला गेला नाही. तसेच लहान व्यापा-यांना सूट देण्याच्या नावाखाली हा कायद्याही अद्याप शासनाने रद्द केलेला नाही. त्यामुळे ते पुन्हा एलबीटी आणू शकतीत. शासनाने 1 ऑगस्ट्पासून एलबीटीची नवीन अधिसूचना लागू करण्याबाबत निर्णय घेतला आहे. रात्री उशीरा पर्यंत त्याबाबत कोणतीही घोषणा झालेली नाही. त्यामुळे उद्या ( शनिवार) पासून एलबीटी बाबत काय स्थिती आहे. हे लक्षात घेऊन व्यापारी संघटनांच्या येत्या 3 ऑगस्ट रोजी होणा-या बैठकीत पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे रांका यांंनी स्पष्ट केले.
==========================