शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
2
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
3
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
4
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
5
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
6
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
7
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
8
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
9
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
10
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
11
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
12
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
13
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
14
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
15
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
16
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
17
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
18
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
19
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
20
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीत आश्वासनांची साखरपेरणी !

By admin | Updated: January 18, 2015 02:10 IST

फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय शिष्टमंडळ आज अर्थमंत्री अरुण जेटली आणि केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण, ग्राहक संरक्षण मंत्री रामविलास पासवान यांना भेटले.

फडणवीस शिष्टमंडळाचा दौरा : जेटली, पासवान म्हणाले, ‘पॅकेज देऊ’नवी दिल्ली : अडचणीत सापलेल्या राज्यातील साखर उद्योगाला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारकडून भरीव पॅकेज मिळेल, या अपेक्षेने दिल्लीला गेलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला गोड आश्वासनापलीकडे काही हाती लागले नाही.ऊसदाराच्या प्रश्नावरून दोन दिवसांपूर्वी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी सरकारची कानउघाडणी केल्यानंतर फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय शिष्टमंडळ आज अर्थमंत्री अरुण जेटली आणि केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण, ग्राहक संरक्षण मंत्री रामविलास पासवान यांना भेटले. शिष्टमंडळात केंद्रीय ग्राहक संरक्षण राज्यमंत्री रावसाहेब दानवे, सहकार मंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, साखर संघाचे अध्यक्ष व खा. विजयसिंह मोहिते-पाटील, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील तसेच विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खा. संजयकाका पाटील, खा. राजू शेट्टी, खा. श्रीकांत शिंदे यांचा समावेश होता.शिष्टमंडळाने जेटलींंना दिलेल्या निवेदनात २० लाख मेट्रिक टन साखर निर्यात करून प्रति मेट्रिक टन ५ हजार रुपये सबसीडी मिळावी, साखर विकास निधीतून देण्यात आलेल्या ३ वर्षांसाठीच्या कर्जाला काही वर्षे मुदतवाढ, ५० लाख मेट्रिक टनांपर्यंत केंद्रीय बफर स्टॉक, यातून येणारे व्याज कारखान्यांना देण्याचा विचार करावा तसेच भाव व उत्पादन खर्चात तफावत असल्याने कारखान्यांच्या कर्जाची पुनर्रचना करण्यात यावी, अशा मागण्या केल्या. त्यावर २१ जानेवारीपर्यंत ठोस निर्णय घेण्यात येईल, एवढेच आश्वासन जेटली यांनी दिले. साखर कारखान्यांनी एफआरपीनुसार दर दिलाच पाहिजे अन्यथा त्यांची साखर जप्त केली जाईल, असा इशारा सहकार मंत्र्यांनी दिला. मात्र भाव गडगडल्यामुळे कारखानदारांनी हे पैसे कुठून द्यायचे, याचे उत्तर त्यांच्याकडे नाही. (विशेष प्रतिनिधी)केंद्र सरकारशी आमची चर्चा सकारात्मक झाली. केंद्राकडून आम्हाला भरघोस मदत मिळेल, अशी अपेक्षा आहे. या भेटीबाबत मी आनंदी व समाधानी आहे.- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्रीमागील दोन पंधरवाड्यांचे शेतकऱ्यांचे बिल कारखान्यांनी एकत्रितपणे द्यावे, अशी मागणी असून एफआरपीनुसार भाव मिळावा, यासाठी आमचे आंदोलन सुरूच राहील.- राजू शेट्टी, खासदार