शहरं
Join us  
Trending Stories
1
नीट पेपरफुटीचा भंडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
2
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
3
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
4
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
5
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
6
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
7
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
8
"असे १०० जाळून टाकेन...", हॉस्पिटलबाहेर फोटो काढणाऱ्या पापाराझींवर भडकला सलमान खान, दिला थेट इशारा
9
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
10
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
11
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
12
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
13
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
14
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
15
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
16
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
17
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
18
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
19
नालेसफाईच्या ठेक्यात १५ टक्के लाचेची मागणी; एपीएमसी उपसचिव अडकला एसीबीच्या जाळ्यात
20
महाविद्यालयात किती रिक्त जागा; आज कळणार , अकरावी प्रवेश प्रक्रियेचा पुढील टप्पा २१ मेपासून 
Daily Top 2Weekly Top 5

Asaram Bapu: आसाराम बापूला कारागृहात कोरोना, आयसीयूत दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2021 09:16 IST

Asaram Bapu : कोरोना संसर्गामुळे आसाराम बापूची ऑक्सिजन पातळी कमी झाल्यामुळे त्याला रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल केले आहे.

ठळक मुद्देगेल्या महिन्यात जोधपूरच्या मध्यवर्ती कारागृहात असलेल्या कैद्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले होते.

जयपूर : राजस्थानमधील जोधपूरच्या मध्यवर्ती कारागृहात (Jodhpur central jail) तुरुंगवास भोगत असलेल्या आसाराम बापूला बुधवारी रात्री प्रकृती बिघडल्यामुळे महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तीन दिवसांपूर्वी आसाराम बापूला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अचानक त्याची तब्येत बिघडली. त्यानंतर जेल प्रशासनाने पुढील उपचारासाठी महात्मा गांधी रुग्णालयात दाखल केले आहे. कोरोना संसर्गामुळे आसाराम बापूची ऑक्सिजन पातळी कमी झाल्यामुळे त्याला रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल केले आहे. (Asaram Bapu Shifted To Mahatma Gandhi Hospital From Jodhpur Central Jail For Treatment After Corona Symptoms)

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, आसाराम बापूला गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची सौम्य लक्षण दिसत होती. सोमवारी 3 मे रोजी त्याची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यानंतर बुधवारी 5 मे रोजी त्याचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. यानंतर त्याची प्रकृती बिघडली. त्याला महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याची प्राथमिक तपासणी करुन त्याला आयसीयूमध्ये दाखल केले आहे. अद्याप त्यांच्या प्रकृतीविषयी कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

दरम्यान, गेल्या महिन्यात जोधपूरच्या मध्यवर्ती कारागृहात असलेल्या कैद्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले होते. या कारागृहातील जवळपास एक डझन कैद्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर या सर्व कोरोना पॉझिटिव्ह कैद्यांना कारागृहातील डिस्पेंसरीमध्ये आयसोलेट करण्यात आले होते. 

याआधीही आसाराम बापूला रुग्णालयात दाखल केले होते
याआधी 18 फेब्रुवारीला आसाराम बापूला छातीत दुखत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी दोन दिवसांच्या उपचारानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यानंतर आसाराम बापूची रवानगी पुन्हा जोधपूर मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली होती. या घटनेवेळी आसाराम बापूचे अनेक अनुयायी मोठ्या संख्येने जेलच्या बाहेर जमले होते. 
 

टॅग्स :Asaram Bapuआसाराम बापूcorona virusकोरोना वायरस बातम्याRajasthanराजस्थान