आसारामबापू-बेपत्ता महिला पोलिसांसमक्ष हजर

By Admin | Updated: December 28, 2014 23:40 IST2014-12-28T23:40:31+5:302014-12-28T23:40:31+5:30

आसाराम बापूंवरील बलात्काराचा आरोप

Asaram Bapu - absconding female police presence | आसारामबापू-बेपत्ता महिला पोलिसांसमक्ष हजर

आसारामबापू-बेपत्ता महिला पोलिसांसमक्ष हजर

ाराम बापूंवरील बलात्काराचा आरोप
बेपत्ता महिला पोलिसांसमक्ष हजर
इंदूर/सुरत - आध्यात्मिक गुरू आसारामबापू यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करणारी आणि गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असलेली महिला रविवारी अचानक सुरत पोलिसांसमक्ष हजर झाली.
ही महिला सुरतमधून बेपत्ता झाल्यानंतर इंदूर येथे असल्याची सूचना पोलिसांना प्राप्त झाली होती. त्यानुसार सुरत पोलिसांचे एक पथक सकाळी येथे पोहोचले. दरम्यान, ही महिला सुरत पोलीस ठाण्यात आली असल्याची माहिती त्यांना मिळाली. इंदूरचे पोलीस अधीक्षक (पूर्व) ओ.पी. त्रिपाठी यांनी ही माहिती दिली. पीडिता इंदूरमध्ये नसल्याचे त्यांनी शनिवारीच सांगितले होते.
दुसरीकडे सुरतचे पोलीस अधीक्षक (ग्रामीण) प्रदील सेजूल यांनी तक्रारकर्ती महिला स्वत:च पोलीस ठाण्यात आल्याचे स्पष्ट केले. सदर महिलेने आसारामबापूंविरुद्ध गेल्यावर्षी बलात्काराची तक्रार नोंदविली होती. (वृत्तसंस्था)

Web Title: Asaram Bapu - absconding female police presence