स्वामींच्या मठात काय करू नये? सगळी सेवा एका क्षणात शून्य होईल; ‘हे’ केल्यास पुण्यच लाभेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 15:46 IST2026-05-06T15:41:03+5:302026-05-06T15:46:03+5:30

Shree Swami Samarth Math Seva Rules: स्वामींच्या मठात गेल्यावर अनेकांना असे अनुभव येतात, असे म्हटले जाते. तुम्ही स्वामींच्या मठात गेल्यावर काय करता?

know what should not be done in the shree swami samarth math all seva will be nullified in an instant do this things bring merit | स्वामींच्या मठात काय करू नये? सगळी सेवा एका क्षणात शून्य होईल; ‘हे’ केल्यास पुण्यच लाभेल!

स्वामींच्या मठात काय करू नये? सगळी सेवा एका क्षणात शून्य होईल; ‘हे’ केल्यास पुण्यच लाभेल!

Shree Swami Samarth Math Seva Rules: प्रत्येक गुरुवारी स्वामींच्या मठाण जाणे, स्वामींचे दर्शन घेणे, असा अनेकांचा नित्यक्रम असतो. परंतु, अनेक जण सुट्टीच्या दिवशी किंवा एखाद्या गावी गेले असता, तेथील स्वामींच्या मठात जातात. अक्कलकोटला जाऊनही हजारो भाविक दर्शन घेतात. अक्कलकोटसह स्वामींचे असे काही मठ आहेत किंवा मंदिरे आहेत, जिथे मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी पाहायला मिळते. अशावेळी रांगेत उभे राहून स्वामींचे दर्शन घेतले जाते. स्वामींच्या मठात गेल्यावर काही गोष्टी आवर्जून टाळाव्यात असे सांगितले जाते. स्वामींची सेवा करण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता, याबाबतही काही ठिकाणी सांगितले गेले आहे. जाणून घेऊया...

स्वामींच्या मठाची पायरी चढली की, गॉसिप बंद करावे. अनेकदा दर्शन रांगेत उभे राहिले की, लोक अनेकदा कोणाबद्दल तरी गॉसिप करत राहतात. हिने असे केले, त्याने तसे केले वगैरे. घरातील व्यक्तींबद्दलही चर्चा केली जाते. परंतु, आपण स्वामींच्या मठात आलो आहोत. स्वामींचे दर्शन घेण्यासाठी आलो आहोत. याचे भान ठेवणे आवश्यक आहे. स्वामींच्या लीला, स्वामींची शिकवण, स्वामींचे उपदेश यांचे स्मरण करा. स्वामी नामाचा जप करावा. 

स्वामींना मनापासून शरण जावे, स्वामींकडे सेवेची याचना करावी

स्वामी मठात एकदा गेले की, अगदी शरणागत भाव मनात असावा. तसेच आपण स्वामींची अमूक सेवा करतो. स्वामीचा अमूक एवढा जप करतो. स्वामींसाठी तमूक करतो, असे कोणालाही सांगू नये अथवा कोणासमोर याची वाच्यता करू नये. त्यामुळे आपण जी काही सेवा केली आहे, ती एका क्षणात शून्यावर येऊ शकते. याउलट मी स्वामींचे काही करत नाही, स्वामी माझ्याकडून अमूक सेवा करून घेतात. तेच सर्वकाही आहेत, असा भाव मनात असला पाहिजे. याबाबत अनेक लोकांचे अनेकविध अनुभव आहेत. स्वामींकडे याचना करावी की, स्वामी माझ्या मनात अमूक एक सेवा करण्याची इच्छा आहे. कृपा करून तुम्ही ती सेवा माझ्याकडून करून घ्यावी, असे स्वामींना सांगावे.

स्वामींची सेवा सुरू करायची असेल तर काय करावे?

स्वामींची सेवा सुरू करायची असेल, तर तरुण पीढीने मठात जाऊन स्वच्छता करावी, झाडलोट करावी, भाविकांना बसण्यासाठी आसनांची व्यवस्था केली असेल, तर तरी आसने स्वच्छ करावीत. मठाच्या आजूबाजूला झाडे असतील, तर त्याखाली साफ सफाई करावी, झाडाला पाणी घालावे. चपला व्यवस्थित स्टँडमध्ये लावून ठेवाव्यात. अगदी समर्पण वृत्तीने या सेवा कराव्यात. हे सर्व झाले की, स्वच्छ हात-पाय धुवायचे आणि मठात जाऊन स्वामींचा यथाशक्ती जप करावा, असे सांगितले जाते. 

- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल.

 

Web Title : स्वामी मठ: गॉसिप से बचें, निस्वार्थ सेवा करें, सेवा के लिए आशीर्वाद लें।

Web Summary : स्वामी मठ जा रहे हैं? गॉसिप और अहंकार से दूर रहें। सफाई जैसी निस्वार्थ सेवा करें। विनम्रता के साथ अपनी सेवा का मार्गदर्शन करने के लिए स्वामी से प्रार्थना करें। भक्ति को अपनाएं।

Web Title : Swami Math: Avoid gossip, serve selflessly, seek blessings for service.

Web Summary : Visiting Swami's Math? Shun gossip and ego. Offer selfless service like cleaning. Pray for Swami to guide your service with humility. Embrace devotion.