बाबासाहेबांच्या जयंतीदिनी ‘यांचे’ आगमन

By Admin | Updated: April 13, 2015 23:53 IST2015-04-13T23:53:09+5:302015-04-13T23:53:09+5:30

या जुळ्या चिमुकल्या बहिणी आहेत खास. कारण यांचा जन्म झालाय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी. यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यांच्यातील एक आहे ह?ी, खोडकर. तिला लगेच राग येतो. बाबासाहेबांची गाणी लावून तिच्या हाती मोबाईल दिला की ती लगेच शांत होते.

Arrival of Babasaheb's Birthday ' | बाबासाहेबांच्या जयंतीदिनी ‘यांचे’ आगमन

बाबासाहेबांच्या जयंतीदिनी ‘यांचे’ आगमन

जुळ्या चिमुकल्या बहिणी आहेत खास. कारण यांचा जन्म झालाय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी. यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यांच्यातील एक आहे ह?ी, खोडकर. तिला लगेच राग येतो. बाबासाहेबांची गाणी लावून तिच्या हाती मोबाईल दिला की ती लगेच शांत होते.
सोलापुरात विजापूर रोडवरील गौतमनगर येथे राहणारे व सांगली येथील आयकर कार्यालयात कार्यरत असलेले शशिकांत दादाराव साबळे व कुसुम साबळे यांच्या स्वरा व सांची या जुळ्या कन्या. यांचे काका विजयकुमार व आत्या विजयालक्ष्मी हेसुद्धा जुळे आहेत.
14 एप्रिल 2012 ही स्वरा व सांची यांची जन्मतारीख. किड्स प्लॅनेट या शाळेत दोघीही प्ले ग्रुपमध्ये आहेत. दोघींच्या दिसण्यात फरक आहे. स्वरा पाप्पांसारखी तर सांची मम्मीसारखी. सांची ही ह?ी, खोडकर आणि हुशारही. सर्व कविता तिला पाठ तर स्वरा ही शांत, समजदार. आजी रुक्मिणी साबळे यांचा तिला जास्त लळा.
-संजय द. शिंदे
सर्वात जास्त जुळे नायजेरियात
जगात सर्वात जास्त जुळे नायजेरियात तर सर्वात कमी जुळे चीनमध्ये आहेत. अमेरिकेत सर्वाधिक जुळे मॅसाच्युसेट्समध्ये आहेत. इथे 5 मुलांमागे 1 जुळे असे प्रमाण आहे.

Web Title: Arrival of Babasaheb's Birthday '