शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
3
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
4
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
6
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
9
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
10
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
11
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
12
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
13
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
14
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
15
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
16
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
17
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
18
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
19
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
20
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
Daily Top 2Weekly Top 5

मिकींविरुद्ध कॅसिनो धमकी प्रकरणीही अटक वॉरंट

By admin | Updated: April 24, 2015 00:55 IST

मडगाव : वीज अभियंता कपिल नाटेकर मारहाण प्रकरणात अडचणीत आलेले माजी मंत्री मिकी पाशेको हे कॅसिनोतील धमकी प्रकरणात पुन्हा अडचणीत सापडले आहेत. या प्रकरणातील सुनावणीस ते गैरहजर राहिल्याने मडगावच्या मुख्य न्यायदंडाधिकारी शबनम शेख यांनी पाशेको यांच्या विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले आहे.

मडगाव : वीज अभियंता कपिल नाटेकर मारहाण प्रकरणात अडचणीत आलेले माजी मंत्री मिकी पाशेको हे कॅसिनोतील धमकी प्रकरणात पुन्हा अडचणीत सापडले आहेत. या प्रकरणातील सुनावणीस ते गैरहजर राहिल्याने मडगावच्या मुख्य न्यायदंडाधिकारी शबनम शेख यांनी पाशेको यांच्या विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले आहे.
माजोर्डा येथील कॅसिनोतील धमकीप्रकरणी पाशेको व त्यांचे मित्र मॅथ्यू दिनिज यांच्यावर सध्या येथील प्रथमवर्ग न्यायालयात खटला चालू आहे. २९ मे २00९ रोजी हे प्रकरण घडले होते. न्यायालयात या खटल्याच्या सुनावणीस हजर राहण्यापासून सूट द्यावी, असा अर्ज मिकी पाशेको यांच्यातर्फे त्यांच्या वकिलांनी न्यायालयात बुधवारी सादर केला असता, तो नामंजूर करण्यात आला होता. पाशेको यांच्या वतीने त्यांचे वकील श्रीकांत नाईक यांनी वरील अर्ज न्यायालयात सादर केला होता. माजोर्डा हॉटेलचे जनरल मॅनेजर गेराल्ड फर्नांडिस यांनी या प्रकरणी कोलवा पोलिसांत तक्रार दाखल केली होती. दोन्ही संशयितांविरुद्ध भादंसंच्या ३५२, ३४१, ५0६ कलमांखाली गुन्हा नोंद केला होता.
पाशेको हे नाटेकर मारहाणप्रकरणी सवार्ेच्च न्यायालयाने कायम केलेल्या सहा महिन्यांच्या शिक्षेविरुद्ध पुनर्विचार याचिका दाखल करण्यासाठी दिल्लीत असल्याने त्यांना माजोर्डा कॅसिनोप्रकरणी न्यायालयात सुनावणीस गैरहजर राहण्यासाठी अनुमती द्यावी, असा अर्ज पाशेको यांचे वकील नाईक यांनी न्यायालयात केला होता. या अर्जाला जोरदार विरोध करताना सरकारी वकील व्ही. जी. कॉस्ता यांनी नाटेकर मारहाण प्रकरणातील शिक्षेसंदर्भात पाशेको यांच्याविरुद्ध न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरंट बजाविले असल्याचे सांगताना, माजोर्डा कॅसिनो प्रकरणातील अन्य एक संशयित मॅथ्यूवर न्यायालयात गैरहजर राहात असल्याबद्दल यापूर्वीच अजामीनपात्र वॉरंट बजाविल्याचे न्यायालयाच्या लक्षात आणून दिले होते. (प्रतिनिधी)