शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

दिल्ली विधानसभा विसर्जित करण्यास मंजुरी

By admin | Updated: November 5, 2014 01:00 IST

यामुळे दिल्लीत नव्याने निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला असून येत्या जानेवारी वा फेबु्रवारीत विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे़

नवी दिल्ली : आम आदमी पार्टी सरकारने राजीनामा दिल्यानंतर गत आठ महिन्यांपासूनची राजकीय अनिश्चितता संपुष्टात आणत, दिल्ली विधानसभा विसर्जित करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंगळवारी मंजुरी दिली़ यामुळे दिल्लीत नव्याने निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला असून येत्या जानेवारी वा फेबु्रवारीत विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे़सर्वोच्च न्यायालयाचा हस्तक्षेप आणि बिगर भाजपा पक्षांनी घेतलेल्या कठोर भूमिकेनंतर दिल्लीत विधानसभा निवडणुका घेण्याशिवाय नायब राज्यपाल नजीब जंग यांच्याकडे अन्य कोणताही पर्याय उरलेला नव्हता़ त्यानुसार, जंग यांनी काल सोमवारी दिल्ली विधानसभा बरखास्त करण्याची शिफारस राष्ट्रपतींकडे केली होती़ राष्ट्रपतींनी ही शिफारस मान्य करून संबंधित प्रस्ताव केंद्राकडे पाठवला होता़ या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संक्षिप्त बैठकीत, दिल्ली विधानसभा बरखास्त करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली़ या बैठकीनंतर एका वरिष्ठ मंत्र्याने सांगितले की, केंद्रीय मंत्रिमंडळाने दिल्ली विधानसभा तात्काळ प्रभावाने बरखास्त करण्याची शिफारस केली आहे़अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने राजीनामा दिल्यानंतर गत १७ फेबु्रवारीपासून दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू आहे़ यादरम्यान भाजपाने सरकार स्थापनेची समीकरणे जुळवून बघितली़ मात्र बहुमताचा जादुई आकडा गाठणे शक्य नसल्याने व सर्वोच्च न्यायालय स्वत: घोडेबाजाराकडे लक्ष ठेवून असल्याने भाजपाने अखेर सरकार स्थापनेस नकार दिला़ आम आदमी पार्टीनेही दिल्लीत सरकार बनविण्यास अजिबात तयार नसल्याचे कळविले़ त्यामुळे दिल्लीत निवडणुका घेण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नायब राज्यपालांकडे उरला नव्हता़ (लोकमत न्यूज नेटवर्क)