शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यस्थीच्या आडून ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
2
Latest Marathi News LIVE Updates: पनवेल रेल्वे स्थानकात लिफ्ट कोसळली, ४ प्रवासी असल्याची माहिती
3
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
4
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
5
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
6
शेअर मार्केटचे जोरदार सुरुवात; सेन्सेक्स १६० अंकांनी वधारला, तर निफ्टी २४,४१० पार...
7
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
8
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
9
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
10
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
11
कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज विक्रेत्यांना एन्ट्री देणारा सुरक्षा रक्षक अटकेत; आरोपींची संख्या १० वर!
12
Tarot Card: संयम ठेवा, आठवड्याच्या शेवटी सगळं छानच होईल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
13
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
14
आधी मुलाचं अपहरण, मग जबरदस्तीने मुलींचे कपडे घालून वेश्या व्यवसायात ढकललं
15
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
16
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
17
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
18
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
19
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
20
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
Daily Top 2Weekly Top 5

‘सुप्रीम’च्या आदेशानंतरच नियुक्ती

By admin | Updated: December 28, 2015 00:20 IST

केंद्रीय माहिती आयोगात तीन माहिती आयुक्तांच्या नियुक्तीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

नवी दिल्ली : केंद्रीय माहिती आयोगात तीन माहिती आयुक्तांच्या नियुक्तीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यामुळेच केंद्र सरकारच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देते, याकडे सर्वांचे लक्ष आहे.कार्मिक व प्रशिक्षण विभागाच्या (डीओपीटी) एका वरिष्ठ अधिकाऱ्याने रविवारी यासंदर्भात माहिती दिली. ४ जानेवारीला संबंधित याचिकेवर सुनावणी होणार आहे. माहिती अधिकार कायद्यांतर्गत माहिती मागणाऱ्या लोकांच्या तक्रारी व अपिलांवर सुनावणी करणाऱ्या केंद्रीय माहिती आयोगात एक मुख्य आयुक्त आणि दहा माहिती आयुक्त असतात. सध्या वसंत सेठ, यशोवर्धन आझाद, शरत सभरवाल, मंजूला पराशर, एम.ए. खान युसुफी, मदभूषणम श्रीधर आचार्युलू आणि सुधीर भार्गव असे सात माहिती आयुक्त कार्यरत आहेत. अन्य तीन पदे रिक्त आहेत. डीओपीटीने २०१४ मध्ये मुख्य माहिती आयुक्त व आयुक्तांची पदे भरण्यासाठी अर्ज मागवले होते. आलेल्या अर्जांमधून सर्व पदे भरण्याऐवजी डीओपीटीने सप्टेंबरमध्ये पुन्हा अर्ज मागवले. गत १६ डिसेंबरला पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील नियुक्ती समितीने माजी संरक्षण सचिव आर.के. माथुर यांना मुख्य माहिती आयुक्तपदी नेमले. ज्येष्ठता प्राधान्यक्रमानुसार मुख्य माहिती आयुक्त नेमण्याची परंपरा मोडत ही नियुक्ती केली गेली. तत्पूर्वी ६ नोव्हेंबरला उच्च न्यायालयाने गतवर्षीच्या जाहिरातीच्या अनुषंगाने आलेल्या ५५३ अर्जदारांमधून मुख्य माहिती आयुक्त व माहिती आयुक्तांची नियुक्ती करण्याचे आदेश दिले होते. डीओपीटीने या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.