शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

गॅस दराची घोषणा ३० सप्टेंबर रोजी

By admin | Updated: September 10, 2014 02:06 IST

गॅसचे दर निश्चित करण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीचे काम अंतिम टप्प्यात असून या समितीचा अहवाल उद्या, बुधवारी केंद्र सरकारला सादर केला जाणार आहे.

नवी दिल्ली : गॅसचे दर निश्चित करण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीचे काम अंतिम टप्प्यात असून या समितीचा अहवाल उद्या, बुधवारी केंद्र सरकारला सादर केला जाणार आहे. या अहवालावर विचारविनिमिय करून येत्या ३० सप्टेंबर रोजी गॅसच्या सुधारित दरांची घोषणा करण्याचे संकेत सरकारने दिले आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही दरवाढ दुप्पट नसली तरी दीडपट तरी असेल. त्यामुळे गॅस दरांत वाढ केल्याने महागाईत वाढ होईल, असा आरोप लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान संपुआ सरकारवर करणारे मोदी सरकार आता हे आव्हान कसे पेलणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.दरवाढ अपरिहार्यतज्ज्ञांच्या मते गॅसच्या किमतींचा संबंध थेट अमेरिकी डॉलर व सरकारी खात्यातील वित्तीय तुटीशी निगडीत असल्याने नवी समिती नेमली असली तरी दरवाढ अपरिहार्य आहे. मूळात गॅसची निर्मिती आणि एकूण व्यवहार याकरिता जो खर्च येतो, त्या किमतीत कमालीची अस्थिरता आहे. त्याची झळ सर्वसामान्यंना बसणार आहे.गॅसच्या किमतीतील अस्थिरतेचा फटका प्रामुख्याने सीएनजी, वीज आणि खते या तीन घटकांना बसतो. रुपयाच्या तुलनेत अमेरिकी डॉलरची किमत एक डॉलरने वाढली तरी, युरियाच्या उत्पादनात टनामागे १३७० रुपयांची वाढ होते. तर वीज निर्मितीत प्रति युनिट ४५ पैशांची वाढ होते. सीएनजीच्या किमतीत प्रति किलो ही वाढ दोन रुपये ८१ पैशांपर्यंत आहे. तर पाईपगॅससाठी ही दरवाढ एक रुपया ८९ पैशांची होऊ शकेल.